विशेष प्रतिनिधी
मुंबई : सामनातून पुन्हा एकदा मोदींच्या भगव्या वस्त्रांवर आक्षेप घेत त्यांना लक्ष करत राऊतांनी आपल्याच पक्षाच्या विचारांना तिलांजली वाहिली आहे.एकेकाळी धर्म म्हणजे सर्वकाही असे मानणारी शिवसेना आता धर्म म्हणजे अफूची गोळी असेही म्हणते..मित्र बदलले म्हणजे विचारही बदलतात का ?असा सवाल बदललेली शिवसेना पाहून उपस्थित राहतो. STORY BEHIND SAMNA EDITORIAL: Now for Shiv Sena, religion is opium pill ….! Objections to saffron clothes too … says what Rahul Gandhi says is true …
दोन दिवसांपूर्वी वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं लोकार्पण केलं. वाराणसीतील मोदींचा दौरा अविस्मरणीय ठरला. तब्बल एक हजार वर्षांच्या आक्रमकांचा तमोमय इतिहास पुसून बाबा विश्वनाथ यांची काशीनगरी पुन्हा सोन्यासारखी झळाळून उठली. काशी हे हिंदूंना सर्वांत पूज्य असणारे क्षेत्र आहे. हे देखील शिवसेना विसरली हे दुर्दैवच.
काशीच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला यामुळे प्रचंड चालना मिळाली असून स्थानिक कलाकारांना देखील मोठा वाव मिळाला. काशीमध्ये कॉरिडॉरचे काम सुरू असतानाच मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे देखील सुरू होती. ती यापुढे देखील सुरू राहणारच आहेत. याच कालावधीत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. ७ हजारांहून अधिक स्वच्छतादूत या कामात सध्या कार्यरत आहेत. इथून पुढच्या काळातही स्वच्छता दूतांना मोठ्या प्रमाणावर काम असेल कारण भाविकांची संख्या काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे काम सुरू असतानाच अडीच पटीने वाढली आहे, तर काम पूर्ण झाल्यानंतर ती आणखी अनेक पटींनी वाढणार आहे.
ह्या सर्व बाबींचा विचार न करता शिवसेनेनं भाष्य करत थेट मोदींवर निशाणा साधला आहे. “ज्या तत्परतेने काशीचा विकास घडवून आणला तीच तत्परता लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दाखवायला हवी”, असे शिवसेना म्हणते. मोदींची धार्मिक यात्रा राजकीय प्रचारासाठीच होत असेल तर मग निवडणूकांच्या तोंडावर गंध लावणारे जान्हवं घालणारे … गंगेत डुबकी मारणारे एरवी कुठे असतात. स्वतःला आता हिंदू म्हणवणार्यांनी आत्तापर्यंत कुठला विकास केला हे देखील तितकेच महत्वाचे आहे.
शिवसेनेनं सामना अग्रलेखातून मोदींच्या वाराणसी दौऱ्याबद्दल भाष्य केलं आहे. “पंतप्रधान मोदी यांची काशी यात्रा चांगलीच गाजली आहे. काशी हा मोदींचा मतदारसंघ आहे म्हणून नव्हे, तर मोदी काशीला जाऊन जे धार्मिक, आध्यात्मिक प्रयोग करीत असतात त्याची चर्चा बराच काळ होत असते. मोदी अधूनमधून केदारनाथलाही जात असतात. केदारनाथच्या गुंफेत ध्यानमग्न बसलेल्या पंतप्रधानांची छायाचित्रे मग जगभरात प्रसारित होतात. मोदींची तीर्थयात्रा हा एक प्रकारे राजकीय सोहळाच ठरतो. काशी यात्रेदरम्यान गंगेत डुबकी मारल्याचे छायाचित्र तसेच जगभरात पोहोचले आहे.
वाराणसी येथे उभारलेल्या ‘काशी विश्वनाथ धाम’ प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले. गंगा नदी आणि प्राचीन विश्वनाथ मंदिराला जोडणारा हा कॉरिडॉर आहे. हे मोदींचे स्वप्न होते. 700 कोटी रुपये खर्च करून मोदींच्या स्वप्नांची पूर्तता झाली आहे, पण काही कोटी रुपये उद्घाटन सोहळा आणि प्रसिद्धीवर उडाले आहेत”.
“मोदी यांनी काशीच्या भूमीवरून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचा ‘शंख’ फुंकला. त्यांची ही काशी यात्रा प्रचारासाठीच. सध्या सगळ्यांच्याच धार्मिक यात्रा राजकीय प्रचारासाठीच होत असतात हे देवांनाही ज्ञात असेल. पंतप्रधानांनी मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे मनावर घेतले. महात्मा गांधींची तीच भावना होती. पण अंगावर राख फासून, भगवी वस्त्रे परिधान करून, कपाळास भस्म लावून राज्यकर्त्यांना मंदिरे उभारता येतील, पण राष्ट्र घडवता येणार नाही.
मंदिरे किंवा धार्मिक स्थळे ही अध्यात्माची ऊर्जा केंद्रे आहेत. धर्म म्हणजे अफूची गोळी हे सत्य आहे. त्यामुळे फक्त ‘अफू’ वाटून लोकांना त्यांचे मूळ प्रश्न विसरायला लावू नयेत. ज्या तत्परतेने काशीचा विकास घडवून आणला तीच तत्परता लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दाखवायला हवी”, असं शिवसेनेनं म्हटलंय.
पंतप्रधान मोदींनी काशीत जाऊन गंगेत स्नान केले. त्या गंगास्नानाने त्यांच्या मनाची जळमटे दूर होवोत. विरोधकांविषयीची किल्मिषे नष्ट होवोत आणि काशी विश्वनाथ मंदिराप्रमाणेच लोकशाहीच्या मंदिराचाही जीर्णोद्धार होवो. मोदी हे पंतप्रधान असल्यामुळेच त्यांचे गंगास्नान प्रकाशझोतात राहिले. नाहीतर गंगेत रोज लाखो लोक डुबक्या मारीतच असतात. राहुल गांधी म्हणतात, तेच खरे. इतके लोक गंगेत स्नान करतात, पण कॅमेरा फक्त मोदींवरच!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App