STORY BEHIND EDITORIAL : मोदी किंवा भाजपविरुद्ध आघाडी हे एकमेव ध्येय ठेवूनच विरोधी पक्षांची मोट बांधायची काय? सामनातून राष्ट्रमंचवर बाण ;बैठकीला न बोलावल्याचा राग की जुन्या मित्रावरील प्रेम ?


पवारांचे घर, पवारांचे चाय-बिस्कुट पवारांनी घेतला फक्त आस्वाद .


राष्ट्रमंच चे संस्थापक सिन्हा हे घोर मोदीविरोधक आहेत व सध्या त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.


शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रमंचच्या बैठकीबाबत आता सामनाच्या अग्रलेखातून टिप्पणी करण्यात आलेली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ‘राष्ट्रमंच’ची एक बैठक पार पडली. ज्याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. राष्ट्रमंचाच्या बैठकीचा अजेंडा राजकीय नव्हता. देशाला पर्यायी व्हिजन देण्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी आम्ही एकत्र जमलो होतो, असे घनःश्याम तिवारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले खरे मात्र हि खरी मोदी विरूद्ध टीम तयार करण्याची तयारी होती .तिसरा मोर्चा तयार करण्यासाठी हे सर्व निवडक एकत्र आले होते .आता महाविकास आघाडी सरकार मधील राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा असणार्या पवार यांच्या राष्ट्रमंचच्या बैठकीचा समाचार शिवसेनेच्या सामनातून घेण्यात आला आहे .आता हा बैठकीला न बोलावल्याचा राग आहे की जुन्या मित्रावरील प्रेम हे लवकरच स्पष्ट होईल. STORY BEHIND EDITORIAL: Is the alliance against Modi or BJP the only goal of the opposition parties? Arrows from the match on the national stage; anger for not calling the meeting or love for an old friend?

ही बैठक म्हणजे ‘पवारांचे घर, पवारांचे चाय-बिस्कुट व आपली काय ती विचारमंथनांची घुसळण असा फक्कडसा बेत दिल्लीत झाला.’ अशी टिप्पणी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. पवारांच्या घरी ‘राष्ट्रमंच’चे चहापान झाले. त्यानिमित्ताने विरोधी पक्ष नक्की कोठे आहे? या प्रश्नाला वाचा फुटली इतकेच.’ असं देखील सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.



शिवसेनेच्या मते, दिल्लीत झालेल्या राष्ट्रमंचच्या बैठकीला फार महत्त देण्याची आवश्यकता नाही असाच आजच्या अग्रलेखाचा एकूण सूर आहे. पवारांच्या ६ ‘जनपथ’वर जे लोक जमले ते राजकीय कृतीपेक्षा विचार मंथनावर भर देणारे होते.

मोदी किंवा भाजपविरुद्ध आघाडी हे एकमेव ध्येय ठेवूनच विरोधी पक्षांची मोट बांधायची काय? यावरच आधी विचारमंथन होणं गरजेचं आहे.असा बाण सामनातून सोडण्यात आला आहे .हा बाण म्हणजे थेट मोदी विरोधकांचा निशाना साधणारा आहे .

म्हणजे नक्की काय ?

जावेद अख्तर, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बिनॉय विस्वम, सुधींद्र कुलकर्णी असे काही लोक उपस्थित होते. या बैठकीत राजकीय चर्चेबरोबरच कोरोना संकट, वाढती महागाई, बेरोजगारी अशा प्रश्नावर विचारमंथन झाले. म्हणजे नक्की काय झाले?

2.5 तास बैठक -बैठकीआधी राष्ट्रमंच गाजला-निष्पन्न शुन्य-

शरद पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी राष्ट्रमंच नामक विरोधी पक्ष गटाची एक बैठक झाली. बैठक अडीच तास झाली असे म्हणतात. या बैठकीचा बराच गाजावाजा मीडियाने केला. अर्थात बैठकीआधी हा राष्ट्रमंच जेवढा गाजला तेवढा त्याच्या बैठकीतून काही निष्पन्न झाले नाही. देशात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत, परंतु ते सोडविण्याचे व्हिजन सरकारकडे नाही. सरकारला ते व्हिजन वैगरे देण्याचे काम राष्ट्रमंच करणार असल्याचे सांगण्यात आले.

कमजोर, विस्कळीत पडलेल्या विरोधी पक्षाचा अवतार पाहून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ‘युपीए’ नावाची संघटना आहे, पण देशात प्रबळ, संघटित विरोधी पक्ष आहे काय? हा प्रश्न लटकूनच पडला आहे. पवारांच्या घरी ‘राष्ट्रमंच’चे चहापान झाले. त्यानिमित्ताने विरोधी पक्ष नक्की कोठे आहे? या प्रश्नाला वाचा फुटली इतकेच. मुळात राष्ट्रमंच नावाचा एक प्रकार अस्तित्वात आहे व त्याची स्थापना यशवंत सिन्हा यांनी करुन ठेवली आहे, हे या निमित्ताने उघड झाले आहे. निदान त्यासाठी तरी ‘राष्ट्रमंच’वाल्यांचे आभार मानायला हरकत नाही.

STORY BEHIND EDITORIAL: Is the alliance against Modi or BJP the only goal of the opposition parties? Arrows from the match on the national stage; anger for not calling the meeting or love for an old friend?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात