प्रतिनिधी
सोलापूर : राजकीय सभ्यता ओलांडून एकमेकांवर शरसंधान साधण्याची सध्या सर्वच पक्षांमध्ये जणू राजकीय स्पर्धाच लागली आहे. महाराष्ट्रात आता असा एकही पक्ष नाही की ज्याच्या नेत्याने सभ्यता ओलांडून दुसऱ्या पक्षावर टीका केली नसेल. रोज कोणी ना कोणी सभ्यता ओलांडून शरसंधान साधत आहे. सगळ्या नेत्यांच्या तोंडी सुरुवातीला फुले शाहू आंबेडकरांचा सभ्य सुसंस्कृत महाराष्ट्र अशी भाषा असते. पण नंतर हे नेते मात्र धर्म, जात, लिंग, पंथ या मुद्द्यावरून राजकीय सभ्यता ओलांडताना दिसतात. Statement of former NCP MLA Rajan Patal; Also supports crime against children
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही अशीच राजकीय सभ्यता ओलांडून राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. पाटलाच्या मुलांना लग्नाआधीच बाळं होतात. आमच्या मुलांवर 17 व्या वर्षी 302, 304 कलमाखाली गुन्हे दाखल आहेत आणि त्यांना हा बाळं म्हणतो काय?, असे उद्गार राजन पाटलांनी टाकळी सिकंदरच्या प्रचार सभेत काढले आहेत. त्यावरून आता राजकीय क्षेत्रात मोठा गदारोळ माजला आहे.
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मोहळचे माजी आमदार राजन पाटील विरुद्ध भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यात सामना आहे. या निवडणुकीच्या प्रचारात धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना राजन पाटील यांची जीभ घसरली आहे. पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी बाळं असल्याचे वक्तव्य राजन पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांच वक्तव्य "आमच्या पोरांना लग्नाआधी पोरं होतात" @supriya_sule जी, तुमच्या माजी आमदाराच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया आहे? हीच संस्कृती आहे का राष्ट्रवादी काँग्रेसची? @ChakankarSpeaksजी, या व्यक्तीला नोटीस पाठवणार का? pic.twitter.com/CyBo4zmmbM — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 12, 2022
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांच वक्तव्य "आमच्या पोरांना लग्नाआधी पोरं होतात" @supriya_sule जी, तुमच्या माजी आमदाराच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया आहे?
हीच संस्कृती आहे का राष्ट्रवादी काँग्रेसची? @ChakankarSpeaksजी, या व्यक्तीला नोटीस पाठवणार का? pic.twitter.com/CyBo4zmmbM
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 12, 2022
खासदार धनंजय महाडिक यांनी प्रचारसभेत करताना राजन पाटील यांच्या मुलांना, ‘बाळांनो असे बोलू नका’, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना राजन पाटील यांची जीभ घसरली. ते म्हणाले, “आमच्या पोरांना बाळ म्हणतोय, अरे आम्ही पाटील आहोत. पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी एवढी बाळं असतात. आमच्या पोरांना वयाच्या 17 व्या वर्षीच 302, 307 ची कलमं लागली आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.”
राजन पाटलांच्या या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रात गदारोळ उठला असून राष्ट्रवादीचेच दुसरे आमदार उमेश पाटील यांनी राजन पाटलांवर टीका केली आहे. राजन पाटलांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यावर कोणती कारवाई करणार? याची चर्चा सुरू झाली आहे.
उमेश पाटलांची राजन पाटलांवर टीका
राजन पाटलांचे वक्तव्य महिलांचा अपमान करणारे आहे. स्वत:च्या पोरांना लग्नाअधीच पोरं झाली आहेत, असं सांगणारा असंस्कृत विकृत माणूस भीमा कारखान्याचा नेता म्हणून तुम्हाला चालणार आहे का? अशा शब्दांमध्ये उमेश पाटील यांनी राजन पाटलांचा समाचार घेतला. राजन पाटील यांच्यावर टीका करताना उमेश पाटील यांनी देखील आक्षेपार्ह टिपण्णी केली आहे. राजन पाटील यांच्यासारखा घाणरेडा नेता मोहोळ तालुक्याचा तीनदा आमदार झाला याची आम्हाला लाज वाटते. पाटील म्हणून घ्यायचीही लाज वाटते, असेही उमेश पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App