WATCH : कोरोना काळात एसटीचे 133 कोटींचे नुकसान, कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी

State transport Bus Service loss of Rs 133 crore during Corona period, demand to solve staff problems

State transport Bus Service : औरंगाबाद विभागातून सर्वसामान्याच्या लाडक्या लालपरीसंदर्भात मोठी माहिती परिवहन महामंडळाकडून देण्यात आली आहे. औरंगाबाद विभागातील 2900 कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे. या लॉकडाऊनमध्ये लालपरीचे 133 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने जिल्ह्यात ब्रेक द चेन मोहिमेची सुरुवात प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्यावर अनेक निर्बंध लावण्यात आले. त्यात एसटी बससेवेवरही निर्बंध लावण्यात आल्याने औरंगाबाद विभागातील 550 बसची चाके लॉकडाऊनमध्ये ठप्प झाली. यामुळे प्रत्येक दिवसाला किमान 50 लाखांचे नुकसान झाले असून 14 महिन्यांत 268 दिवसाला दररोज 50 लाखांचे नुकसान याप्रमाणे लालपरीचे 133 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आता प्रत्येकाला लालपरी धावण्याची प्रतीक्षा असून काही मोजक्याच मार्गावरती बससेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे आता पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू करण्याची मागणी एसटी कामगार संघटनेकडून करण्यात आली आहे. 2 हजार 900 कर्मचारी प्रतीक्षेत असल्याची माहिती औरंगाबाद विभागाचे मुख्य व्यवस्थापक यांनी दिली आहे. तर एसटी कामगार संघटनेने कर्मचाऱ्यांची समस्या सोडण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. State transport Bus Service loss of Rs 133 crore during Corona period, demand to solve staff problems

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात