यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत कोविड परिस्थिती, लसीकरण, पीक पाणी परिस्थिती आदी विषयांवर चर्चा झाली. State Cabinet meeting was held at Sahyadri Guest House today; Online presence of Chief Minister Uddhav Thackeray
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज (२५ नोव्हेंबर) सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळाची बैठक झाली.दरम्यान या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एच.एन. रिलायन्स रुग्णालयातून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत कोविड परिस्थिती, लसीकरण, पीक पाणी परिस्थिती आदी विषयांवर चर्चा झाली.
दरम्यान यावेळी बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना क्यक्त करत म्हणाले की, या आजारपणात आपण सर्व जण मला सहकार्य करीत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली फिजिओथेरपी व्यवस्थित सुरू आहे, असेही ते म्हणाले.
रिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी संपासंदर्भात राज्य शासनाने उचललेल्या पावलांची माहिती मंत्रिमंडळास दिली.तसेच कोविड परिस्थिती युरोपमध्ये बिकट होत असून आपण देखील महाराष्ट्रात पुरेशी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे.
कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच चाचण्या वाढवाव्यात. कोविडचा धोका पूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे आरोग्याचे नियम पाळण्यासाठी सर्वानी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत यावर चर्चा झाली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App