विशेष प्रतिनिधी
बीड : विविध आंदोलन काळात, तसेच एरव्ही माथेफिरूचे शिकार बनणाऱ्या एसटी बसचे दगड फेकीमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान देखील होत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर बीड आगारात एसटीला संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम हाती घेतले आहे.ST bus safety nets; Measures to prevent stoning
बीड विभागात संपकाळात आतापर्यंत तीन बसेसवर दगडफेक झाल्याने बसच्या काचा फुटून ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या एक महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना काही कर्मचारी परतू लागल्याने,
काही आगारांतून बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बसच्या दिशेने येणारे दगड रोखण्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाने तारेची संरक्षक जाळी बसविण्याचे काम हाती घेतले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App