महिलांना आजपासून एसटी ५० % सवलतीचे तिकीट; करा सर्व प्रकारच्या गाड्यांमधून निम्म्या भाड्यात प्रवास

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये  महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० % सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस मधून महिलांना तिकीट दरात ५० % सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ST 50% discount ticket for women from today

या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर ‘महिला सन्मान योजना’ म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ % पासून १०० % पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते.


Maharashtra Budget : सारे काही महिलांसाठी… एसटीत ५० टक्के सवलत, आशा व अंगणवाडी सेविकांच्या मानधनात घसघशीत वाढ अन् खास महिलांसाठी विविध क्लस्टर्स


यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात ५० % सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. या सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम शासन महामंडळाला देणार आहे.

ST 50% discount ticket for women from today

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात