म्हणून नवनीत राणा बनल्या पंतप्रधान मोदींच्या भक्त…

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून येऊनही अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सध्या भारतीय जनता पक्षाच्या बाजुने बोलत आहेत. त्याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: त्यांना आवाहन केले होते की स्वत:च्या कर्तृत्वावर निवडून येणाऱ्या राणांसारख्या नेत्या आमच्या पक्षात असायला हव्यात.So Navneet Rana became supported Prime Minister Modi


विशेष प्रतिनिधी

अमरावती : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून येऊनही अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सध्या भारतीय जनता पक्षाच्या बाजुने बोलत आहेत. त्याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: त्यांना आवाहन केले होते की स्वत:च्या कर्तृत्वावर निवडून येणाऱ्या राणांसारख्या नेत्या आमच्या पक्षात असायला हव्यात.

नवनीत राणा यांनीच एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला. पहिल्याच भेटीत मोदींनी त्यांना विनोदाने विचारले, “माझी एवढी मोठी लाट असतानाही आपण कशा काय निवडून आलात?.” त्यावर राणा यांनीही समर्पक उत्तर दिले, “जसे आपण देशभरातील जनतेच्या कायम संपर्कात असता तशी मी माझ्या मतदारसंघातील लोकांशी संपर्कात असते.” राणा यांचे हे उत्तर ऐकून मोदी प्रभावित झाले आणि म्हणाले, “आपल्यासारखे लोक आमच्या पक्षात पाहिजेत. जे माझ्या नावावर नाही, तर स्वत:च्या कामांवर निवडून येतात..”नवनीत राणा यांनी २०१९ च्या निवडणुकीत राष्टवादी  कॉँग्रेसच्या पाठिंब्यावर परंतु अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता.

नवनीत राणा यांचा जन्म मुंबईतील पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील लष्करी अधिकारी होते. बारावी झाल्यावरच त्यांनी मॉडेलिंगला सुरूवात केली. त्यानंतर तेलगू चित्रपटात काम करण्यास त्यांनी सुरूवात केली.

तेलगू चित्रपटसृष्टीत त्यांना चांगले यश मिळाले होते. बाबा रामदेव यांच्या शिबिरात गेल्या असता त्यांची आमदार रवी राणा यांच्याशी ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी लग्न केले. त्यानंतर राणा राजकारणात उतरल्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून त्या लढल्या होत्या.

So Navneet Rana became supported Prime Minister Modi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*