नवनीत राणा यांचा गंभीर आरोप; शिवसेना खासदार अरविंद सावंतांनी जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली!!

प्रतिनिधी

नवी दिल्ली :  शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मला जेलमध्ये टाकण्याची धमकी लोकसभेच्या सभागृहात दिली, असा खळबळजनक आरोप अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी आज केला.shiv sena MP Arvind Sawant thretaned me of sending jail, allaged MP Navneet Rana

सचिन वाझे – अनिल देशमुख खंडणीखोरीच्या मुद्द्यावरून लोकसभेत आज प्रचंड गदारोळ झाला. अनेक खासदारांनी महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून ठाकरे – पवार सरकारच्या बरखास्तीची मागणी केली. यात खासदार नवनीत राणा या देखील होत्या.यावेळी शिवसेना खासदारांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ आणि महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या समर्थनार्थ सभात्याग केला. त्यावेळी सभागृहातून उठून जात असताना खासदार अरविंद सावंत आपल्या आसनापाशी आले आणि पुढचा नंबर तुमचा आहे. तुम्हाला जेलमध्ये टाकू,

अशी धमकी त्यांनी दिली आणि ते निघून गेले, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला. आपल्या मागे बसलेले खासदार सावंतांचे वक्तव्य ऐकत होते, असेही नवनीत राणा यांनी न्यूज १८ इंडिया या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

शिवसेनेच्या गुंडांनी यापूर्वीही मला चेहऱ्यावर अँसीड फेकण्याची धमकी दिली आहे. मी त्याची तक्रार संसद भवन परिसराच्या पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. आज खासदार अरविंद सावंत यांनी दिलेल्या धमकीची तक्रारही आपण लोकसभेच्या सभापतींकडे करणार असल्याची माहिती नवनीत राणा यांनी दिली. महाराष्ट्रात शिवसेनेची अशीच गुंडशाही चालू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

shiv sena MP Arvind Sawant thretaned me of sending jail, allaged MP Navneet Rana

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*