भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक झाली आहे. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ९२ वर्षीय लतादीदी आयसीयूमध्ये आहेत. Singer Lata Mangeshkar health deteriorated again, shifted to ventilator; In hospital for 28 days
वृत्तसंस्था
मुंबई : भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक झाली आहे. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ९२ वर्षीय लतादीदी आयसीयूमध्ये आहेत.
डॉक्टरांच्या पथकाकडून विशेष देखरेख
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणार्या प्रतीत समधानी यांनी माध्यमांना सांगितले की, लताजींची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक 24×7 त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.
उपचारादरम्यान मृत्यूची अफवा
काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांच्या निधनाची अफवा पसरली होती. यानंतर त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत कुटुंबीय म्हणाले की, कृपया खोट्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका आणि या बातम्या बंद करा. ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या प्रतीत समधानी यांनी एक अपडेट दिले आहे. दीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात आणि घरी परताव्यात, अशी जगभरातील तमामत चाहत्यांकडून प्रार्थना होत आहे.
Veteran singer Lata Mangeshkar's health condition has deteriorated again, she is critical. She is on a ventilator. She is still in ICU and will remain under the observation of doctors: Dr Pratit Samdani, Breach Candy Hospital
(file photo) pic.twitter.com/U7nfRk0WnM
— ANI (@ANI) February 5, 2022
पाच दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते की, “मी लताजींवर उपचार करणार्या डॉक्टरांशी बोललो. त्या बरे होत आहेत. त्यांनी कोरोना आणि न्यूमोनियावर मात केली आहे. त्या आधी व्हेंटिलेटरवर होत्या.” पण आज त्यांचे व्हेंटिलेटरही काढले आहे. आता त्यांना फक्त ऑक्सिजन दिला जात आहे. लताजींनी डोळे उघडले आहेत आणि डॉक्टरांशीही बोलत आहेत. कोरोनामुळे त्या थोड्या अशक्त झाल्या आहेत, पण आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे,” अशी माहिती त्यांनी दिली होती.
Singer Lata Mangeshkar health deteriorated again, shifted to ventilator; In hospital for 28 days
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ओवैसी भलेही राष्ट्रवादी नसतील, पण ते देशभक्त आहेत’, गोळीबाराच्या घटनेनंतर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचे प्रतिपादन
- १९९३च्या बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड दहशतवादी अबू बकरला सौदीतून अटक, लवकरच भारतात आणणार
- म्हणे, राहुल गांधींचा सरकारच्या डोक्याला शॉट…, मिनू मासानी, पिलू मोदी, मधू लिमये, मधू दंडवते विरोधकांना तरी झेपतील काय??
- पुण्यातील रिक्षाचालकांचे दादा क्या हुवा वो वादा ? आंदोलन , बाईक टॅक्सी बंद करण्याचे अश्वासन पाळले नाही