धक्कादायक ! समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांकडून पाळत; NCB ची पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार

वृत्तसंस्था

मुंबई : NCB वर पाळत ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही पोलीस अधिकारी आमचा पाठलाग करत आहेत अशी तक्रार काल रात्री NCB च्या अधिकाऱ्यांनी मुंबईच्या वरिष्ठ पोलिसांना केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा पाठलाग होतो आहे असं NCB ने त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे. 2 ऑक्टोबरला NCB ने एक मोठी कारवाई करत ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानसह आठ जणांना अटक केली. Shocking! Sameer Wankhede under surveillance by Mumbai Police; NCB’s complaint to police officer

NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार केली आहे. मागच्या सहा वर्षांपासून समीर वानखेडे हे त्यांच्या आईचे अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी एका कब्रस्तानात जातात. त्यावेळी दोन पोलीस तिथलं सीसीटीव्ही चेक करत होते असं सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समोर आलं आहे. हे दोघे समीर वानखेडे काय करतात यावर लक्ष ठेवून होते असं सूत्रांनी म्हटलं आहे.

एनसीबीचे विभागीय संचालक यांना ही बाब लक्षात आली त्यामुळे त्यांनी ही तक्रार मुंबईच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समीर वानखेडे हे जेव्हापासून विभागीय संचालक झाले आहेत तेव्हापासून ते ड्रग्ज प्रकरणातल्या हाय प्रोफाईल केसेस हाताळत आहेत.

NCB तर्फे जी कारवाई होते त्या हाय प्रोफाईल केसेसमध्ये समीर वानखेडे पुढे असतात. मुंबईच्या क्रूझ पार्टीवर जो छापा मारण्यात आला त्यात शाहरूख खानच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला अटक करण्यात आलं आहे. याआधी सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर जे ड्रग प्रकरण समोर आलं होतं त्यामध्ये कारवाई करण्यात समीर वानखेडे पुढे होते. समीर वानखेडे यांनी त्यावेळी अनेक हायप्रोफाईल सेलिब्रिटीजची चौकशी केली होती.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनाही NCB ने नऊ महिन्यांपूर्वी अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणात ही अटक झाली होती. या अटकेतही समीर वानखेडे यांचाही सहभाग होता. दरम्यान आत्ता जी ड्रग्ज प्रकरणात कारवाई करण्यात आली त्यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन NCB वर गंभीर आरोप केले. हे सगळं प्रकरण म्हणजे एक बनाव असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर NCB ने पत्रकार परिषद घेऊन आम्ही कोणतीही जात-पात- धर्म पाहून कारवाई करत नाही, तर जे चुकीचं आणि अयोग्य आहे त्यावरच कारवाई करतो असं समीर वानखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हटलं आहे.

Shocking! Sameer Wankhede under surveillance by Mumbai Police; NCB’s complaint to police officer

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात