शिवसेनेचे मराठी पाऊल पडते मागे; मुंबईत दुकानांच्या पाट्या मराठीत करायला मुदतवाढ!!


  • व्यापारी संघटनांपुढे महापालिका प्रशासन झुकले

प्रतिनिधी

मुंबई : मराठीच्या मुद्द्यावर आग्रह जाणाऱ्या शिवसेनेचे मुंबई मराठी पाट्यांच्या बाबतीत मार्ग मात्र एक पाऊल मागे पडले आहे. Shivsena on the backfoot over the issue of marathi boards on shops and businesses establishments
महापालिका प्रशासन आणखी एकदा धनशक्ती पुढे झुकले आहे. यापूर्वी विकासक, हॉटेल व्यावसायिक, जाहिरातदार कंपन्या आदींना कर आणि प्रीमियममध्ये महापालिका प्रशासनाने सवलती दिल्या होत्या. आता दुकानांचे व्यापारी यांच्यासमोर मान झुकवली आहे. दुकानांच्या पाट्या मराठीतून न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने मुंबईतील दुकाने आणि आस्थापना यांच्या मराठी नामफलकाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. विविध व्यापारी संघटनांनी महापालिका प्रशासनाला केलेल्या विनंतीचा विचार करुन ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

मुंबईतील मराठी नामफलकासाठी मद्य विक्रीची दुकाने व मद्य पुरविण्यात येणाऱ्या आस्थापनांव्यतिरिक्त इतर दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता दिनांक ३० जून २०२२ पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. जर ३१ मे पर्यत या पाट्या मराठीतून न केल्यास पुढील १५ दिवसांत सर्व्हे करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता.

या पूर्वी मुंबई महापालिकेने हॉटेल व्यावसायिकांना मालमत्ता करात सवलत दिली होती. जाहिरात होर्डिंग व्यवसायिकांनाचे कोविड काळातील परवाना शुल्क माफ केले होते. विकासकांना प्रीमियम भरण्यास सवलत दिली होती. त्यामुळे आतापर्यंत प्रशासन धनशक्ती पुढे झुकत असताना मराठी पाट्या करण्यावरून दिलेल्या मुदतवाढीमुळे प्रशासनाने पुन्हा आपला कल कुठे आहे हे दाखवून दिले आहे.

Shivsena on the backfoot over the issue of marathi boards on shops and businesses establishments

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात