10 Corporators in Matheran Municipal Council : जळगावमध्ये शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचे 6 नगरसेवक फोडले होते. याचा वचपा भारतीय जनता पक्षाने माथेरानमध्ये काढला आहे. माथेरान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह 10 नगरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे. Shivsena 10 Corporators in Matheran Municipal Council Joins BJP Today
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : जळगावमध्ये शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचे 6 नगरसेवक फोडले होते. याचा वचपा भारतीय जनता पक्षाने माथेरानमध्ये काढला आहे. माथेरान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह 10 नगरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे.
माथेरान नगरपालिकेत एकूण 14 नगरसेवक आहेत. सर्व नगरसेवक शिवसेनेचे होते. त्यातील 10 जणांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात हा प्रवेश सोहळा झाला. या पक्षांतरामुळे माथेरान नगरपालिकेत भाजपला बहुमत मिळालं आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये आकाश चौधरी (उपनगराध्यक्ष/ आरोग्य समिती सभापती), राकेश चौधरी, सोनम दाभेकर, प्रतिमा घावरे, रूपाली आखाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे, संदीप कदम, चंद्रकांत जाधव यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही कमळ हाती घेतलं आहे.
भाजपाच्या विकासाच्या धोरणावर विश्वास ठेवत माथेरान नगरपरिषदेतील १४ पैकी १० नगरसेवकांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व नगरसेवकांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! @JPNadda @dev_fadnavis pic.twitter.com/p30U5aGIjQ — Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) May 27, 2021
भाजपाच्या विकासाच्या धोरणावर विश्वास ठेवत माथेरान नगरपरिषदेतील १४ पैकी १० नगरसेवकांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व नगरसेवकांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! @JPNadda @dev_fadnavis pic.twitter.com/p30U5aGIjQ
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) May 27, 2021
शिवसेनेतील स्थानिक नेत्यांमुळे आम्हाला कामे करण्याचे स्वातंत्र्य नव्हते, म्हणूनच केंद्राच्या मदतीने माथेरानचा विकास करायचा आहे, त्याचे आश्वासन आम्हाला भाजपकडून मिळाले. म्हणूनच आम्ही शिवसेना सोडली. असे उत्तर माथेरानच्या दहा नगरसेवकांच्या पुढाकाराने उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी दिले. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित शिवसेनेच्या दहा नगरसेविकांनी कोल्हापूर येथे भाजपमध्ये प्रवेश केला.
सर्वांच्या वतीने उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी मोठा खुलासा केला. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कोणीही नाराज नाही. आम्ही सर्वच स्थानिक नेत्यांच्या जाचाला कंटाळलो होतो. स्थानिक नेत्यांच्यामुळे आम्हाला विकासकाम करण्याचे स्वातंत्र्य नव्हते. त्यामुळे हा वेगळा निर्णय घेतला. माजी मंत्री रवींद्र चव्हाण व आमदार प्रशांत ठाकूर यांनी माथेरानच्या विकास कामासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले आहे. माथेरान गिरीस्थान नगरपरिषद ही जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याच्या विकासासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती आकाश चौधरी यांनी दिली.
Shivsena 10 Corporators in Matheran Municipal Council Joins BJP Today
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App