आमने-सामने: सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागणारे आणि कोरोना लसीवरून राजकारण करणारे केजरीवाल यांना संबित पात्रा यांचे सडेतोड उत्तर !


केजरीवाल म्हणाले की, उद्या पाकिस्तानने युद्ध केले तर सर्व राज्यांनी आपापल्या परीने पाहावे असे ते म्हणणार नाहीत. दिल्ली सरकार हारले तर भारत हारला. केजरीवाल यांच्या या विधानावर आता भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. BJP got Angry on Arvind kejariwal’s pak attack statement. remembering surgical strike statements.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाकिस्तान संदर्भात केलेल्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सडेतोड उत्तर दिले आहे . आज तुम्ही या प्रकरणात पाकिस्तानला मध्ये आणण्याचा प्रयत्न केला. युद्धाच्या बाबतीत दिल्ली आणि उत्तर प्रदेश वेगवेगळी शस्त्रे आणि दारुगोळा घेतील का, असे आपण विचारले होते. परंतु, जेव्हा आम्ही सर्जिकल स्ट्राइक दरम्यान एकजुट होऊन लढतो तेव्हा तुम्हीच पुरावे मागता !



कोरोना लसीवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर असंबद्ध टीका केली . यावर भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा भडकले असून त्यांनी सर्जिकल स्ट्राईकवर बोट दाखवणाऱ्या केजरीवालांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

आपला देश कोरोनाविरोधात युद्ध लढत आहे. जर पाकिस्तानने हल्ला केला तर तुम्ही राज्यांवर याची जबाबदारी सोडणार आहात का? उत्तर प्रदेश स्वत:चे रणगाडे खरेदी करणार आहे का की दिल्ली स्वत:ची हत्यारे खरेदी करणार आहे? असे केजरीवाल म्हणाले होते.

संबित पात्रा काय म्हणाले?

दिल्लीमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत, ही आनंदाची बाब आहे. मात्र, दु:खद म्हणजे केजरीवालांचे राजकारण सुरु आहे. आम्ही केजरीवालांना आज टीव्हीवर दोनदा पाहिले, त्यांचा उद्देश फक्त प्रचार करण्याचा होता. केंद्र सरकारकडून गेल्या 130 दिवसांत सर्व राज्यांना 20 कोटी कोरोना लसी पुरविल्या गेल्या आहेत. दिल्ली सरकारकडे आता 1.5 लाख लसी उपलब्ध आहेत. नियोजन आणि वितरण करणे दिल्ली सरकारचे काम आहे, पण दुर्दैवाने मुख्यमंत्री केजरीवाल यांचे राजकारण सुरूच आहे. भाजपचे आज आम्ही दोनदा अरविंद केजरीवाल यांना टीव्हीवर पाहिले आहे आणि दोन्ही वेळा ते खोटारडे, गोंधळाचे आणि क्रेडिटचे राजकारण करताना दिसले.

तुम्ही विचारलात की दिल्ली, उत्तर प्रदेश युद्धावेळी वेगवेगळी हत्यारे आणि दारुगोळा घेऊन लढणार का? परंतू आम्ही जेव्हा सर्जिकल स्ट्राईकवेळी एकत्र होऊन लढलो, तर तुम्हीच त्यावर प्रश्न उपस्थित करता, केजरीवालांनी यावर माफी मागायला हवी, अशी मागणी पात्रा यांनी केली.

BJP got Angry on Arvind kejariwal’s pak attack statement. remembering surgical strike statements.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात