विशेष प्रतिनिधी
जळगाव : शिवसेनेच्या जळगावच्या महापौर आणि उपमहापौरांसह २५ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप कार्यालयात अनधिकृतपणे प्रवेश करून पक्ष कार्यकर्त्यांना धक्का बुक्की केली होती. महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभुषण पाटील यांचा यामध्ये समावेश आहे. Shiv Sena’s Jalgaon mayor, deputy mayor and 25 others have been charged with rioting.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याने शिवसेनेच्या वतीने महापौर जयश्री महाजन उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे प्रीतम शिंदे शोभा चौधरी सरिता कोल्हे आदींनी राणे यांचा निषेध म्हणून शहरात आंदोलन केले.
टॉवर चौकात डुकरे सोडून राणे यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. त्यानंतर महापालिकेच्या कार्यालयाच्या बाहेर घोषणाबाजी केली. तेथून भाजपच्या वसंत स्मृती या कार्यालयास अनधिकृतपणे प्रवेश करून पक्ष कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली.
या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी मुंबई पोलीस अधिनियम सदतीस तीनशे उल्लंघन देखील केलेले आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कमलेश भगवान पाटील यांच्या फियार्दीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App