शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांनी अख्रेर मागितली ब्राह्मण समाजाची जाहीर माफी

वृत्तसंस्था

मुंबई : शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी काल औरंगाबाद येथे ब्राह्मण समाजावर भाष्य केले होते. ज्यामध्ये ब्राह्मण समाज व हिंदुत्वाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. दरम्यान त्यांच्या आता या विधानांवर राज्यातील ब्राह्मण संघटना आक्रमक झाल्या. राऊत यांनी तात्काळ समाजाची माफी मागावी अन्यथा मातोश्रीवर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ब्राह्मण सेवा संघाने दिला होता. त्यानंतर राऊत यांनी ब्राह्मण समाजाची जाहीर माफी मागितली आहे. Shiv Sena MP Vinayak Raut finally apologizes to the Brahmin community



यावेळी राऊत म्हणाले, आज ब्राह्मण समाजाच्या सदस्यांची भेट घेताना आनंद झाला. काही कळत नकळत माझ्या तोंडून उद्गार निघाले त्यात कोणाचाही अनादर करणे हा उद्देश नव्हता. मी नतमस्तक आणि माफी मागायला आलो आहे. ब्राह्मण समाजाची माफी मागून त्यांनी कृपा आशीर्वाद कायम ठेवावा असे आवाहन केले आहे. याशिवाय काही चूक झाली असेल तर माफ करा, असेही त्यांनी म्हटले आहे.

Shiv Sena MP Vinayak Raut finally apologizes to the Brahmin community

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात