खासदार गजानन कीर्तीकरांचा दुसऱ्यांदा घरचा आहेर; म्हणाले, शिवसैनिक लढवय्या राहिला नाही!!


प्रतिनिधी

अमरावती : शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी आपल्या पक्षातच्या नेत्यांना आणि शिवसैनिकांना लागोपाठ दुसऱ्यांदा घरचा आहेर दिला आहे. शिवसैनिक आता पूर्वीसारखा लढवय्या उरला नाही, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेचे वाभाडे काढले आहेत .MP Gajanan Kirtikar’s second home run; Said, Shiv Sainik is no longer a fighter !!

अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेवर मरगळ आली आहे. प्रत्येक जण गटातटात विखुरला आहे. भाजपप्रणित राणा दाम्पत्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर शिंतोडे उडवित असताना येथील शिवसैनिक मूग गिळून गप्प राहतो. राणा विरोधात कोणीच का बोलत नाही?, असा खोचक सवाल कीर्तिकर यांनी केला आहे.



याआधी रत्नागिरी जिल्ह्यात बोलताना किर्तीकर यांनी शिवसेना नेतृत्व असे वाभाडे काढले होते म्हणायला ठाकरे सरकार आहे. पण फायदा पवार सरकार घेतेय, अशा शब्दांत यांनी राष्ट्रवादीवर कठोर टीका केली होती.

त्यानंतर अमरावतीच्या दौर्‍यात त्यांनी शिवसैनिकांना कानपिचक्या दिल्या आहेत.शिवसेना लढवय्या संघटना असून पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांची हकालपट्टी करू, असा त्यांनी दिला. यावेळी कीर्तीकर यांनी अमरावती जिल्ह्यातील शिवसेना कार्यकारिणीत फेरबदलाचे संकेतही दिले.

शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कान टोचले

शिवसेनेच्यावतीने विदर्भात शिवसंपर्क दौरा आयोजित केला होता. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप बडनेरा मार्गावरील महेंद्र लॉन येथे जिल्ह्यातील महत्त्वाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला. या बैठकीत कीर्तीकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. खासदार कीर्तीकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आठ निरीक्षकांचे पथक चार दिवसांपासून जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी अमरावतीत ठाण मांडून होती. निरीक्षकांमध्ये पराग बने, मोकळ व अन्य सेना नेत्यांचा समावेश होता. श
दौऱ्याच्या समारोपात कीर्तीकर यांच्यासमोर स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला.

एकाच दिवशी दोन मिरवणुका ही शोकांतिका

शिवसेनेतील दुफळीबाबत बोलताना त्यांनी शहरातील शिवसेनेच्यावतीने काढण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या मिरवणुकीवर कटाक्ष टाकला. शिवसैनिकांनी एकाच दिवशी अशा दोन मिरवणुका काढणे ही शोकांतिका असल्याचे कीर्तीकर म्हणाले. एकीकडे राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष जिल्ह्यात वरचढ ठरत असताना राज्याचा मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेची जिल्ह्यात वाताहत होत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी खासदार कीर्तीकर यांनी स्व. संजय बंड यांच्या कार्याची आवर्जून आठवण करून दिली. जिल्ह्यातील शिवसेनेत हीच स्थिती राहिल्यास कार्यकारिणीत फेरबदलाचे संकेत त्यांनी दिले. तसेच पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांची हकालपट्टी करू, असा इशाराही कीर्तीकर यांनी यावेळी दिला.

निरीक्षकांसमोरच एकमेकांवर ताशेरे

बडनेरा मार्गावरील महेंद्र लॉन येथे शिवसंवाद दौऱ्याच्या समारोपीय कार्यक्रमात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना एकमेकांवर ताशेरे ओढले. एकमेकांचे उट्टे काढताना आता तुम्हीच लक्ष घाला, असे शिवसेना नेतांना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मनोगतातून सांगितले. यातूनच शिवसेनेतील दुफळी समोर आली.

MP Gajanan Kirtikar’s second home run; Said, Shiv Sainik is no longer a fighter !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात