गजानन कीर्तिकर श्रीरंग बारणेंपाठोपाठ शिवसेनेचे तिसरे खासदार राष्ट्रवादीवर भडकले; धनंजय मुंडेंवर ओमराजे निंबाळकरांचे शरसंधान!!


विशेष प्रतिनिधी

बीड : शिवसंपर्क अभियानात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना खासदारांना भाजपच्या आरोपांना कडक प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. पण प्रत्यक्षात शिवसेनेचे खासदार एकापाठोपाठ एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी वरच जोरदार तोफा डागताना आढळत आहेत. After Gajanan Kirtikar Shrirang Barne, the third Shiv Sena MP attacked the NCP; Omraje Nimbalkar’s Sharasandhan on Dhananjay Munde !!

राष्ट्रवादी वर टीकेची सुरुवात शिवसेनेचे वरिष्ठ खासदार गजानन कीर्तिकर यांनी कोकणातून केली. त्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीकडे खेचून देण्याचा डाव उधळून लावू, असा इशारा दिला आणि आता उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर भडकले आहेत.

भाजपला प्रत्युत्तर देण्याचे आदेश पण…

शिवसेना खासदार उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे भाजपला प्रत्युत्तर देत नाहीत असे नाही. ते भाजपवर विशेषत: केंद्रीय तपास संस्थांवर आगपाखड करताना दिसतातच पण त्याहीपेक्षा पलिकडे जाऊन ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार तोफा डागताना दिसत आहेत. बीडमध्ये शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसंपर्क अभियानात राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका केली.ओमराजे निंबाळकर म्हणाले, उस्मानाबादेत आमचा पालकमंत्री आहे. तिथे महाविकास आघाडीचा धर्म पाळला जातो. मात्र बीडमध्ये उलट होत आहे, असे म्हणत त्यांनी थेट धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागरांवर यांच्यावर निशाणा साधला. तुम्हाला आम्ही त्रास देत नाही, त्यामुळे कृपा करुन आम्हालाही त्रास देऊ नका. दोन हात करायची वेळ आली तर आम्हीही कमी पडणार नाही असा थेट इशारा निंबाळकर यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत वाद उफाळून आला आहे.

निंबाळकर म्हणाले की, सकाळीच मी पालकमंत्र्यांना विनंती केली असून उद्धव ठाकरे आणि अनिल देसाईंच्या कानावरही ही गोष्ट घालणार आहे. जर उस्मानाबादमध्ये फॉर्म्यूला पाळण्यास सांगितले जात असेल तर बीडमध्येही पाळला पाहिजे. जो नियम आम्हाला आहे तो तुम्हालाही आहे. याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेत आहे, कोणीही चिंता करण्याचं कारण नाही.

आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असतानाही असा अन्याय होत असेल तर आम्ही सहन करणार नाही, जाब विचारला जाईल. आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही, कृपा करुन आम्हाला त्रास देण्याच्या भानगडीत पडू नका,” असा इशारा ओमराजेंनी यावेळी दिला. दोन हात करायची वेळ आली तर शिवसैनिक कमी पडणार नाही, योग्य उत्तर दिले जाईल, असेही ते म्हणाले.

After Gajanan Kirtikar Shrirang Barne, the third Shiv Sena MP attacked the NCP; Omraje Nimbalkar’s Sharasandhan on Dhananjay Munde !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण