बहुमत आपल्याला शक्य नाही, महापालिका त्रिशंकूच राहू द्या, ४० जागा निवडून आणा, महापौर शिवसेनेचाच – संजय राऊत


  • सत्ता कशी आणायची याचा संजय राऊतांनी शिवसैनिकांना दिला कानमंत्र

विशेष प्रतिनिधी

पिंपरी – बहुमत आणायच्या नादी लागू नका, ते आपल्याला जमणार नाही. महापालिका त्रिशंकूच असली पाहिजे हे लक्षात घ्या, ४०- ४५ जागा जिंकलो तरी  १०० टक्के महापौर आपलाच. आपण फार मोठे स्वप्न बघत नाही की, १०० – १५० जागा येतील, तशा येणार नाहीत. हे आपल्याला माहिती आहे. पण महापौर आपल्याशिवाय होणार नाही हे पाहा, अशा शब्दांमध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊतांनी सत्ता कशी आणायची, याचा कानमंत्र शिवसैनिकांना दिला. Shiv sena MP sanjay raut openly supports horse trading in PCMC

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या निवडणूकीसाठी शिवसैनिकांच्या मेळाव्यात त्यांनी शिवसैनिकांना सत्तेवर येण्याचा मार्ग दाखविला. ते म्हणाले, की जसे आम्ही म्हणत होतो, मुख्यमंत्री आमचाच होणार….झाला की नाही… पहिल्या दिवसापासून कोणाला माहिती होते की ५५ –  ५६ आमदारांच्या बळावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. पण झाला ना… तसेच इथे असे दोन चार पत्ते हातात घ्या की शिवसेनेशिवाय सत्तेचे पान हालता कामा नये, असा राजकीय सल्ला संजय राऊत यांनी शिवसैनिकांना दिला.



मंत्रालयापेक्षा महापालिका, जिल्हा परिषदा ही आपली ताकद आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ४०- ४५ जागा जिंकलो तरी १०० टक्के महापौर शिवसेनेचाच होणार हे लिहून घ्या. महापालिकेत कोणाला बहुमत मिळता कामा नये. महापालिका त्रिशंकूच आली पाहिजे हे लक्षात घ्या. आपण फार मोठे स्वप्न बघत नाहीत. की, १०० – १५० जागा येतील. तशा येणार नाहीत हे आपल्याला माहिती आहे. पण, महापौर शिवसेनेशिवाय होणार नाही… असे पत्ते पिसा, असे राऊत म्हणाले.

Shiv sena MP sanjay raut openly supports horse trading in PCMC

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात