शिवसेनेचे दोन मंत्री व्याही झाले पण त्यांनी आपल्याच सरकारच्या नियमावलीचा नियमभंग केला आहे. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांचा मुलगा आविष्कार आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची कन्या लतीशा यांचा विवाह झाला. मालेगावातील आनंद फार्म इथे ववाह सोहळा संपन्न झाला. मात्र, विवाह सोहळ्यात २० लोकांनाच परवानगी असताना या ठिकाणी नातेवाईकांसह अनेक आमदार आणि मंत्र्यांनीही हजेरी लावली होती.Shiv Sena MLAs and MP violated government rules
विशेष प्रतिनिधी
मनमाड : शिवसेनेचे दोन मंत्री व्याही झाले पण त्यांनी आपल्याच सरकारच्या नियमावलीचा नियमभंग केला आहे. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांचा मुलगा आविष्कार आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची कन्या लतीशा यांचा विवाह झाला.
मालेगावातील आनंद फार्म इथे ववाह सोहळा संपन्न झाला. मात्र, विवाह सोहळ्यात २० लोकांनाच परवानगी असताना या ठिकाणी नातेवाईकांसह अनेक आमदार आणि मंत्र्यांनीही हजेरी लावली होती.
अविष्कार दादाजी भुसे आणि लतीशा राजन विचारे मालेगावमधील आनंद फार्म येथे विवाह बंधनात अडकले. मीडियालाही या सोहळ्यात प्रवेश देण्यात आला नव्हता. ज्या फार्म हाऊसवर हा विवाह सोहळा झाला,
त्या फार्म हाऊसच्या गेटवर परवानगीशिवाय आत येऊ नये असा फलक लावण्यात आला होता. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र विशेष अतिथी आणि त्यांच्या वाहनांना परवानगी देण्यात आली.
राज्यातील काही आमदार, खासदार यांच्या गाड्या गेटमधून सोडण्यात आल्या. पोलीस आणि सुरक्षा पथकांचा मात्र या ठिकाणी राबता पाहायला मिळाला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी
या सोहळ्यास उपस्थित राहून वधू वरांना शुभ आशीर्वाद दिला. अन्न पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या विवाह सोहळ्यात ऑनलाईन सहभागी होऊन आविष्कार आणि लतीशा यांना आशीर्वाद दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App