शिवसेनेला धक्का : ‘घरच्या’ मतदार संघाच प्रतिनिधित्व करणार्या तृप्ती सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश


  • शिवसेनेच्या विधानसभेच्या बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

  • वांद्रे पूर्व या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मतदारसंघात, तृप्ती सावंत यांनी शिवसेनेचं प्रतिनिधीत्व केलं होतं. मात्र त्यांनीच आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

विशेष प्रतिनिधी 

मुंबई: शिवसेनेच्या माजी आमदार आणि गेल्या विधानसभा निवडणूकीत मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला आव्हान देत बंडखोरी करणा-या तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.विशेष म्हणजे शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘वांद्रे पूर्व’ या मतदारसंघाच प्रतिनिधीत्व केलं होतं .Push to Shiv Sena: Trupti Sawant, who represents ‘home’ constituency, joins BJP

शिवसेनेचे माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आणि शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपात प्रवेश केला आहे.विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर,भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला.

बेगडी हिंदुत्वाकडून भगव्या हिंदुत्वाकडे…

2019 च्या विधानसभा निवडणुकीत तृप्ती सावंत यांचं तिकीट कापून, शिवसेनेने तत्कालिन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मतदारसंघातील शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला होता. इथे काँग्रेसचा उमेदवार झिशान सिद्दीकी यांनी बाजी मारली होती.

Push to Shiv Sena: Trupti Sawant, who represents ‘home’ constituency, joins BJP

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था