विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी, “मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारली असती”, असे अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर नारायण राणे यांच्यावरही तितक्याच अवमानकारक वक्तव्यांचा भडिमार शिवसेनेच्या नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी केला आहे. Shiv Sena minister Gulabrao Patil made same controversial statement against Narayan Rane
शिवसेनेचे महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारमधले मंत्री गुलाबराव पाटील यांनी, “नारायण राणे यांच्या अंगात चुडैल शरली काय?? त्यांना भानामतीच्या भक्ताकडे नेऊन त्यांचे वेड काढले पाहिजे आणि त्यांना ठाण्याच्या मनोरुग्णालयात दाखल करून शॉक दिले पाहिजेत,” अशी अवमानकारक वक्तव्ये करून नारायण राणेंना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांनी दादरमध्ये नारायण राणे यांचे भलेमोठे पोस्ट लावले. त्यावर कोंबडीचोर असे मोठ्या अक्षरात लिहिले आहे.
नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे या सगळ्या शेरेबाजी वरून खवळले असून त्यांनी खरे आईचे दूध पिलेले असेल तर समोर या मग हिंमत दाखवा कुठेतरी कोपऱ्यात पोस्टर लावू नका, असे आव्हान शिवसैनिकांना दिले आहे.
“मुख्यमंत्र्यांना कानाखाली लावू”, असा आवाज टाकणाऱ्या नारायण राणेंवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी “हात तोडू”ची भाषा वापरत कालच धमकी दिली आहे. मात्र, गुलाबराव पाटील आणि विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यांवर मात्र गुन्हे दाखल झाल्याच्या बातम्या अद्याप आलेल्या नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App