विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद: शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी रामनगर येथील साखर कारखाना खरेदीविक्रीच्या व्यवहारादरम्यान १०० कोटींचा घोटाळा केला आहे. ऐवढेच नव्हे तर आता ते कारखान्याची १ लाख कोटींची जवळपास २५० एकर जमीन बळकाविण्याच्या प्रयत्नात आहेत असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना केला.Shiv Sena leader Arjun Khotkar commits Rs 100 crore scam, alleges Kirit Somaiya
सोमय्या म्हणाले, काही दिवसांपूर्वी औरंगाबाद आणि जालना येथे ईडीची छापेमारी झाली. यामागे अर्जुन खोतकर यांच्या राम नगर येथील साखर कारखान्याचा व्यवहार आहेत. हा व्यवहार २०१२ ते २०२१ या दरम्यान झाला. दोन्ही ठिकाणाचे व्यापारी आणि उद्योगपती यांच्या माध्यमातून अर्जुन खोतकर यांनी जवळपास १०० कोटींचा घोटाळा केला आहे.
आता खोतकर हे कारखान्यास शेतकऱ्यांनी दिलेली सुमारे १ लाख कोटींची २५० एकर शेतजमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहते. संबंधित शेतकरी आणि काही व्यक्तींनी मला ही माहिती दिली आहे. त्यावरून मी ईडी, राज्य सरकार आणि आता केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे.
शरद पवार म्हणतात, अनिल देशमुख यांच्या प्रत्येक क्षणाची शिक्षा दिली जाईल. मात्र, त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीच कारागृहात टाकले. मग, ही धमकी कुणाला देता, धमक्यांची मालिका सुरू करा. 23 जणांची चौकशी सुरू आहे.
त्यात अनिल परब, हसन मुश्रीफ, भावना गवळीही आहेत. आज मी अर्जुन खोतकर यांचे नाव घेत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सहकारीच असे घोटाळे करू शकतात. मुळे, तापडिया आणि खोतकरांनी मिलिभगत करून हा कारखान्याचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्या यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App