संभाजीराजे उमेदवारी : सगळीकडून शिवसेनेवर शरसंधान; पण शाहू महाराजांचा वेगळा सूर!!


प्रतिनिधी

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा निवडणुकीतील माघारीनंतर विविध मराठा संघटना, विरोधी पक्ष भाजप, महाविकास आघाडीतील काँग्रेस असे सगळीकडून शिवसेनेवर शरसंधान सुरू झाले असताना दस्तुरखुद्द संभाजीराजे यांचे पिताश्री कोल्हापूरचे शाहू महाराज यांनी मात्र याबाबत वेगळा सूर लावला आहे. छत्रपती संभाजीराजे यांना व्यक्तीगतरित्या शिवसेनेने उमेदवारी दिलेली नाही. त्यामध्ये छत्रपती घराण्याचा अपमानाचा संबंध येत नाही. सर्व राजकीय पक्षांनी छत्रपती घराण्याचा सन्मान ठेवला आहे, असे वक्तव्य शाहू महाराज यांनी केले आहे. Shiv Sena from all sides; But Shahu Maharaj’s different tone

त्याच वेळी शाहू महाराजांनी संभाजी राजे यांना माघार घ्यावी लागल्याच्या एकूण राजकारणाबाबत संशयाची सुई देवेंद्र फडणवीस संचालक दिशेने देखील वळवली. खासदारकी मिळवण्यासाठी अपक्ष उभे राहा. कदाचित महाविकास आघाडीचाही पाठिंबा मिळेल, असा सल्ला कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संभाजीराजे यांना मिळाला असेल. पण त्यात नेमके किती धक्के आहे हे मला माहिती नाही, असे वक्तव्य शाहू महाराजांनी केले आहे.

संभाजीराजे यांनी जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला असा आरोप केला असला तरी शाहू महाराजांनी मात्र तसे म्हणणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. एखाद्या राजकीय पक्षाची उमेदवारी हवी असेल तर त्या राजकीय पक्षाचे नियम पाळावेच लागतात. शिवसेनेची संभाजीराजे यांच्याकडून शिवबंधन बांधून उमेदवारी घेण्याची अपेक्षा असेल तर त्यात काही गैर नाही, असे सूचक उद्गार देखील शाहू महाराज यांनी काढले. शाहू महाराज यांच्या आजच्या वक्तव्यातून ते अजूनही शिवसेनेत असल्याचेच स्पष्ट होत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

-माझ्याशी विचारविनिमय नाही : शाहू महाराज

संभाजीराजे यांनी 2009 नंतर जे राजकीय आणि सामाजिक निर्णय घेतले त्याबाबत आपलीशी कोणताही विचारविनिमय केला नाही. सर्व निर्णय त्यांनी व्यक्तिगत पातळीवर घेतले, असे सांगून शाहू महाराज म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटल्यानंतर त्यांनी त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची देखील भेट घ्यायला हवी होती. परंतु कदाचित त्यांनी तसे केले नसेल, असे उद्गार शाहू महाराजांनी काढले आहेत.

शाहू महाराजांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात संभाजीराजे यांची राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी, माघार आणि त्यानंतरचे राजकारण याला वेगळे वळण लागले आहे.

Shiv Sena from all sides; But Shahu Maharaj’s different tone

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात