शनिवारी शिंदे सरकारची बहुमत चाचणी, २ व ३ जुलैला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन


वृत्तसंस्था

मुंबई : मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्याआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.Shinde government’s majority test on Saturday, special session of the legislature on July 2 and 3

त्यामुळे आता शिंदे गट व भाजपचे सरकार राज्यात सत्तारूढ झाले आहे. या नव्या सरकारला राज्यपालांनी बहुमत सिद्ध करा, असे आदेश दिले आहेत. यासाठी येत्या २ व ३ जुलैला विशेष अधिवेशन घेतले जाणार आहे.शनिवारी (२ जुलै) अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी नव्या सरकारला आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३९ आमदार असून त्यांनी आपला गट हा शिवसेना असल्याचा दावा केला आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजूनही १६ आमदार असून हे आमदार बहुमत चाचणीवेळी कोणत्या गटाला मतदान करणार, पक्षादेश कोण काढणार, याची उत्सुकता लागली आहे..

Shinde government’s majority test on Saturday, special session of the legislature on July 2 and 3

महत्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती