प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात मराठी माध्यमांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंगाच्या आरोपाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचा अजेंडा चालवला असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या अजेंड्याकडे फारसे लक्ष न देता आपला सोशिओ पॉलिटिकल अजेंडा पुढे चालवला आहे. आज 16 नोव्हेंबर 2022 रोजी त्याचा प्रत्यय आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या आज दिवसभरातल्या संयुक्त कार्यक्रमांनी त्यांच्या सोशियो पॉलिटिकल इंजीनियरिंगची साक्ष दिली. Shinde – Fadnavis Socio Political Engineering Ambedkar Memorial Gift to Savarkar – Balasaheb Heritage of Hindutva
राजगृहाला शिंदे यांची भेट
मराठी माध्यमांमध्ये उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय युतीची आणि भेटीची जोरदार चर्चा रंगली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अचानक राजगृह या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी जाऊन प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. बाबासाहेबांचे निवासस्थान आणि तिथल्या बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तू पाहिल्या. प्रकाश आंबेडकरांशी बंद दाराआड 15 मिनिटे चर्चा केली. या दोन्ही नेत्यांनी बाहेर आल्यानंतर आपले राजकीय दृष्ट्या जुळू शकणार नाही, असे जरी सांगितले असले, तरी त्यामागे राजकारणच नव्हते, अशी कोणालाही खात्री देता येणार नाही. प्रकाश आंबेडकरांनी आधीच शिवसेना आणि कॉंग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. परंतु, त्या ऑफरकडे शिवसेनेने अथवा काँग्रेसने अद्याप लक्ष दिलेले नाही. त्यामुळे त्यांची वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास मोकळी आहे, असे त्यांनी स्वतः स्पष्ट केले. पण या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशियो पॉलिटिकल इंजिनिअरिंगचे पहिले पाऊल टाकले हे मात्र निश्चित!!
इंदू मिल मधल्या स्मारकाला भेट
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इंदू मिल मधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नियोजित स्मारकाला भेट दिली. तिथल्या काही समस्या जाणून घेतल्या आणि संबंधितांचे शंकांचे निराकरण केले. त्यानंतर शिंदे – फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या कामाच्या ठिकाणी जाऊन भेट दिली. या राष्ट्रीय स्मारकाच्या समितीवर नेमके कोण आहे?, याच्याशी सरकारला काही देणे घेणे नाही. बाळासाहेबांचे स्मारक राष्ट्रीय पातळीवर प्रेरणादायी व्हावे, हा शासनाचा हेतू आहे, असे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले.
सावरकर + ठाकरे हिंदुत्वाचा वारसा
बाळासाहेबांच्या नियोजित स्मारकाला भेट देऊन आल्यानंतर शिंदे आणि फडणवीस हे दोन्ही नेते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात हिंदुत्वाचा वारसा या कार्यक्रमात सहभागी झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन्ही नेत्यांचा हिंदुत्वाचा वारसा समान आहे आणि तोच आपण पुढे नेत आहोत, असे या दोन्ही नेत्यांनी सावरकर स्मारकात स्पष्ट केले. एकीकडे मराठी माध्यमे जितेंद्र आव्हाड यांच्या निमित्ताने राष्ट्रवादीचा अजेंडा पुढे चालवत असताना दुसरीकडे शिंदे आणि फडणवीस यांनी मात्र आज दिवसभरातल्या आपल्या कार्यक्रमांमधून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीचे सोशियो पॉलिटिकल इंजीनियरिंग करून घेतले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App