शिंदे – फडणवीसांचा ठाकरे – पवारांना ‘स्वाभाविक’ धक्का ! ; राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द !

प्रतिनिधी

मुंबई : ऐन गणेशोत्सवात राजकीय वातावरण गरमागरमच आहे. बड्या नेत्यांची एकमेकांच्या घरी जाऊन गणेश दर्शने सुरू आहेत. त्याचबरोबर राजकीय निर्णय देखील थांबलेले नाहीत. उलट वार – पलटवार जोरात सुरू आहेत. असाच एक “स्वाभाविक” वार शिंदे – फडणवीस यांनी ठाकरे – पवारांवर केला आहे. ठाकरे – पवारांची शिफारस असलेली विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी शिंदे – फडणवीस सरकारने रद्द केली आहे. Shinde-Fadnavis government cancels list of 12 MLAs appointed by Governor

ठाकरे – पवार सरकारच्या अडीच वर्षांच्या काळातील दीड वर्षे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी ज्या मुद्यावर वाद मोठ्या प्रमाणात चिघळाला होता, तो म्हणजे राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी. राज्यपाल कोशियारी यांच्याकडे ठाकरे – पवार सरकारने विधान परिषदेतील १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी पाठवली होती. मात्र, सरकार कोसळेपर्यंत राज्यपालांनी या यादीवर स्वाक्षरी केलीच नाही. आता शिंदे – फडणवीस सरकारने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी रद्द केली आहे.



– शिंदे – फडणवीस सरकारची नवीन यादी 

ठाकरे – पवार सरकारने राज्यपालांकडे १२ विधान परिषद नियुक्त सदस्यांची यादी पाठवली होती. मात्र राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी ही यादी संमत केली नाही. या यादीवर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल वेळ लावत आहेत, कारण यामागे त्यांचे राजकारण आहे, अशी टीका तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे आणखी वाद पेटला होता. तरीही राज्यपाल कोशियारी यांनी ही यादी मंजूर केली नाही. अखेर भाजपने शिंदे गटाच्या मदतीने ठाकरे – पवार सरकारला अल्पमतात आणले. त्यामुळे ठाकरे – पवार सरकार कोसळले, त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. या नव्या सरकारने राज्यपालांना यांना ठाकरे- पवार सरकारची ‘ती’ यादी रद्द करत असल्याचे कळविले आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारची नवीन यादी लवकरच राज्यपाल कोशियारी यांना पाठवली जाईल. त्यामध्ये भाजप आणि शिंदे गटातील अनुक्रमे ८ आणि ४ आमदार असतील, अशी चर्चा आहे.

Shinde-Fadnavis government cancels list of 12 MLAs appointed by Governor

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात