Devendra Fadnavis takes a dig at Sharad Pawar For misleading Info about HM Deshmukh

Fadnavis On Sharad Pawar : पवारांचे देशमुखांबाबत वक्तव्य दिशाभूल करणारे, फडणवीसांनी दिला ‘हा’ पुरावा

परमबीर सिंग यांच्या खळबळजनक पत्रात निलंबित एपीआय आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भेटीचा उल्लेख आहे. परमबीर यांनी गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावरून दिल्लीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा बचाव केला आहे. पवार म्हणाले की, अनिल देशमुख कोरोनामुळे क्वारंटाइन होते त्यामुळे त्यांच्या आणि वाझेंच्या भेटीचा प्रश्नच येत नाही. परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनिल देशमुखांचा 15 फेब्रुवारी रोजीचा पत्रकार परिषदेचा व्हिडिओ शेअर करून शरद पवार दिशाभूल करत असल्याचे दाखवून दिले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : परमबीर सिंग यांच्या खळबळजनक पत्रात निलंबित एपीआय आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भेटीचा उल्लेख आहे. परमबीर यांनी गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावरून दिल्लीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा बचाव केला आहे. पवार म्हणाले की, अनिल देशमुख कोरोनामुळे क्वारंटाइन होते त्यामुळे त्यांच्या आणि वाझेंच्या भेटीचा प्रश्नच येत नाही. परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनिल देशमुखांचा 15 फेब्रुवारी रोजीचा पत्रकार परिषदेचा व्हिडिओ शेअर करून शरद पवार दिशाभूल करत असल्याचे दाखवून दिले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी पवारांना घेरले

शरद पवार यांच्या पत्रकार परिषद झाल्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांचे 15 फेब्रुवारीचे एक ट्विट शेअर केले असून त्यामध्ये ते पत्रकार परिषदेत घेताना दिसत आहेत. देवेंद्र फडवीसांनी असा सवाल केला आहे की, 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?

आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये फडणवीस म्हणाले की, परमवीर सिंग यांच्या पत्रावर श्री शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असे स्पष्टपणे दिसून येते. या पत्रात नमूद केलेला ‘एसएमएस’चा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे. आता नेमके कोण दिशाभूल करते आहे?

काय म्हणाले होते शरद पवार?

पवार म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे 5 ते 15 फेब्रुवारीदरम्यान देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे वाझे यांच्याशी झालेल्या संभाषणाचा प्रश्नच उद्भवत नाही. फेब्रुवारी महिन्यात अनिल देशमुख आणि वाझे यांच्यात संभाषणे झाले, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. परमबीर सिंह तपासाची दिशा बदलण्यासाठी असे चुकीचे आरोप करत आहेत. पत्रात नमूद केलेल्या काळात वाझे आणि देशमुख यांच्यात संभाषण झाल्याचा पुरावा मिळालेला नाही, असेही ते म्हणाले.

असे आहे संपूर्ण प्रकरण

25 फेब्रुवारीला देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईस्थित अँटिलिया या घराच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. सुरुवातीला हे दहशतवाद्यांशी संबंधित कृत्य असल्याचे म्हटले जात होते. परंतु लवकरच राष्ट्रीय तपास संस्थेने हे प्रकरण ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आणि संशयाची सुई एपीआय सचिन वाझे यांच्यावर फिरली. यानंतर स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन यांची हत्याही झाली. प्रकरण अंगावर शेकत असल्याचे पाहून महाविकास आघाडी सरकारने तातडीने परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी केली. यानंतर याच परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित भ्रष्टाचाराची पोलखोल एका पत्राद्वारे केली आहे. या पत्र प्रकरणामुळे अवघ्या देशात खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*