शिंदे – फडणवीस सरकार जाणार की राहणार??; अजितदादा – जयंत पाटलांमध्ये मतभेद; राष्ट्रवादीत विसंवाद!!

प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय मार्गी लागल्यानंतर महाराष्ट्रातले शिंदे – फडणवीस सरकार जाणार की राहणार??, या विषयावर शिंदे – फडणवीस अथवा शिवसेना भाजप यांच्यात कोणतीही शंका नाही. पण विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यातच मतभेद असल्याचे समोर आले आहे.Shinde Fadanavis government stability, conflicting statements by ajit Pawar and jayant patil shows fued in NCP

शिवसेनेच्या शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरले तरी शिंदे – फडणवीस सरकारकडे बहुमत आहे. त्यामुळे हे सरकार टिकेल असे वक्तव्य अजितदादांनी यापूर्वी किमान दोनदा केले आहे. काल त्यांनी पुन्हा एकदा तसेच वक्तव्य केले.



मात्र या संदर्भात आज जयंत पाटलांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी शिंदे – फडणवीस सरकार जाईल, असा दावा केला. 16 आमदारांमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तेच अपात्र ठरले तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि मग उरलेल्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये चलबिचल निर्माण होऊन ते परत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत येण्याचा विचार करू शकतात. त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकार निश्चित जाईल. नवीन सरकार कोणाचे येईल?, हा पुढचा विषय आहे. राज्यपाल त्यावेळी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपलाही सरकार स्थापनेसाठी पाचारण करू शकतात, असे वक्तव्य जयंत पाटलांनी केले.

याचा अर्थ एकीकडे शिंदे – फडणवीस सरकार टिकेल असे अजित दादा म्हणाले, तर हे सरकार जाईल, असे जयंत पाटील म्हणाले. यातून महाराष्ट्रातल्या विद्यमान सरकार विषयी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीतलाच राजकीय विसंवाद उघड झाला आहे.

Shinde Fadanavis government stability, conflicting statements by ajit Pawar and jayant patil shows fued in NCP

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात