पवारांचा दक्षिण महाराष्ट्राचा “डॅमेज कंट्रोल” दौरा राष्ट्रवादीच्या आकड्यांच्या हिशेबात कितपत फलदायी??


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शरद पवारांनी निवृत्ती नाट्य घडवून आणल्यानंतर दक्षिण महाराष्ट्राचा केलेल्या डॅमेज कंट्रोल दौऱ्यातून राष्ट्रवादीचा नेमका आकड्यांच्या नशिबात हिशेबात किती फायदा होईल??, हा खरा प्रश्न आहे.Sharad Pawar’s damage control tour of south maharashtra; how much beneficial for NCP in number game??

सातारा – सोलापूर का निवडले??

कारण निवृत्ती नाट्य घडविल्यानंतर पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचा संघटनात्मक डॅमेज कंट्रोल करणे भाग होते. त्यामुळेच त्यांनी आपला फेव्हरेट दक्षिण महाराष्ट्र राजकीय दौऱ्यासाठी निवडला. ते सोलापूर, सातारा जिल्ह्याचा दौरा करून आले. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये एकेकाळी प्रबळ असलेली राष्ट्रवादी आता निसटत्या आणि घसरत्या प्रभावाखाली उरली आहे. तेथे आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भेटून काही कार्यक्रम घेऊन पवारांनी आपला “पॉलिटिकल ऍक्टिव्हिजम” दाखविला. तो दाखविणे पवारांसाठी राजकीय अपरिहार्यता होती. पण त्यातही दक्षिण महाराष्ट्राचा दौरा करताना पवार सांगली किंवा कोल्हापूर जिल्ह्यात गेले नाहीत, तर त्यांनी पावसात भिजलेला सातारा जिल्हा आणि सोलापूर जिल्हा हे दोन जिल्हे निवडले. याचा अर्थ तुलनेने प्रश्नपत्रिकेतला सोपा प्रश्न पहिला सोडविण्याचे विद्यार्थ्यांचे तंत्र पवारांनी अवलंबिले.



साताऱ्यात ताकद घटली

2004 ते 2009 मध्ये सातारा जिल्ह्यातले 9 आमदार आणि 2 खासदार ही राष्ट्रवादीची संघटनात्मक कमाई होती. ती 2014 आणि 2019 मध्ये घटून 3 आमदार आणि 1 खासदार एवढी झाली आहे. आता ही मोठी आकड्यांच्या हिशेबातली ही घट भरून काढण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आव्हान आहे आणि त्याच्याच मागे पवार लागले आहेत.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची ही नमूद केलेली घट कितपत भरून निघेल??, हा प्रश्नच आहे.

सोलापूरचे आव्हान जास्त बिकट

जे सातारा जिल्ह्याचे, तेच सोलापूर जिल्ह्याचे. सोलापूर जिल्ह्यात एकेकाळी 12 पैकी 9 आमदार ही राष्ट्रवादीची कमाई होती. सोलापूर जिल्ह्यात 1 काँग्रेस आणि 1 राष्ट्रवादी असे 2 खासदार होते. त्यापैकी माढा मतदारसंघात स्वतः पवारच खासदार होते. पण 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा एकही खासदार उरलेला नाही. आमदारांची संख्या तिथे 4 आहे. याचा अर्थ सोलापूर जिल्ह्यातले डॅमेज कंट्रोल राष्ट्रवादीसाठी सातारा जिल्ह्यापेक्षा जास्त कठीण आहे. सोलापूर जिल्ह्यातही राष्ट्रवादीचा घटना प्रभाव हा पवारांच्या चिंतेचा विषय आहे.

शरद पवारांनी निवृत्ती नाट्यादरम्यान पर्सेप्शन लेव्हलवर 3 दिवस मराठी माध्यमांमधून प्रसिद्धीची भरपूर कमाई केली. पण या कमाईचे रूपांतर राष्ट्रवादीच्या आकड्यांच्या हिशेबात मोठे करणे किती कठीण आहे हेच सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आकडेवारीवरून दिसते.

 

अफाट ताकदीपुढे राष्ट्रवादी कमकुवत

हा डॅमेज कंट्रोल आता वयाच्या 83 व्या वर्षी करण्यासाठी पवार स्वतः मैदानात आले आहेत. त्यात आकड्यांच्या हिशेबात ते किती यशस्वी होतात??, हे पाहणे राष्ट्रवादीच्या संघटनात्मक भवितव्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. कारण भाजप आणि शिवसेनेचा शिंदे गट हे पवारांची राष्ट्रीय नेता म्हणून बूज जरूर राखतात, पण संघटनात्मक पातळीवर मात्र राष्ट्रवादीला पुरते डॅमेज करून ठेवतात. हा 2014 आणि 2019 मधला अनुभव आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्हा पवारांच्या हातातून भाजपने आणि शिवसेनेने पुरते काढून घेतले आहेत. तेथे राष्ट्रवादीला संघटनात्मक पातळीवर एवढे डॅमेज झाले आहे, की तेथे पवार जाऊन काही कंट्रोल करू शकतील, असा फारसा वावच उरलेला नाही.

अशा स्थितीत दक्षिण महाराष्ट्र देखील पूर्ण हातात नाही अशी पवारांच्या राष्ट्रवादीची संघटनात्मक दूरवस्था आहे. संख्याबळ वाढवून ती दूर करणे हे सह्याद्री एवढे तरी मोठे आव्हान पवारांपुढे आहे. वयाच्या 83 व्या वर्षी पवार हे आव्हान कसे पेलणार??, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

Sharad Pawar’s damage control tour of south maharashtra; how much beneficial for NCP in number game??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात