राज ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांचे आवाहन; ऋतुजा लटकेंची निवड बिनविरोध करा

प्रतिनिधी

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक शिवसेनेचा ठाकरे गट आणि भाजप आमने-सामने आले असताना राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या निवडणुकीत वेगळा ट्विस्ट आणला. शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांची निवड बिनविरोध करावी, असे आवाहन त्यांनी केले. अशाच आशयाचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील केले आहे.Sharad Pawar’s appeal after Raj Thackeray

या निवडणुकी संदर्भात शरद पवारांनी वेगळा तर्क मांडला आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे. त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. परिवारातलीच व्यक्ती पोटनिवडणुकीसाठी उभे राहत असेल तर शक्यतो निवडणूक बिनविरोध करावी, असे आम्हाला वाटते.

शिवाय ही निवडणूक फक्त दीड वर्षासाठीच आहे. कारण दीड वर्षानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणारच आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा बोजा उमेदवारावर टाकू नये, असे आपल्याला वाटत असल्याचे शरद पवार म्हणाले.

राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याची आपल्याला कोणतीही कल्पना नाही. आपण फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने पक्षाची भूमिका मांडतो आहोत. असे ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीचे उदाहरण दिले. मुंडे यांच्या परिवारातील कोणी उभे राहणार असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही, असे त्यावेळी त्यांनी जाहीर केले होते. त्यावेळी तर लोकसभा सदस्यत्वाचा पावणे पाच वर्षांचा कालावधी होता. पण तरी देखील राष्ट्रवादीने मुंडे परिवाराच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही, असा निर्णय घेतला होता, याची आठवण पवारांनी करून दिली.

त्याचवेळी भाजपने पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करायचा का नाही हा सर्वस्वी त्या पक्षाचा अधिकार असल्याचाही खुलासा शरद पवारांनी केला.

Sharad Pawar’s appeal after Raj Thackeray

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात