शिवसेनेत फूट : सरकार वाचवण्यासाठी जेवढे पवार घायकुतीला, तेवढे ठाकरे सरकार घसरणीला!!


ठाकरे लागले राजीनाम्याच्या तयारीला, पण सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादीत प्रचंड घायकुतीला!!, असे आजचे 1.30 वाजताचे चित्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त 14 आमदार उरल्यानंतर त्यांची मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मानसिकता झाली आहे. त्यासाठी त्यांनी मंत्रालयातील सर्व सचिवांचे आभार मानणारी बैठक दुपारी 12.30 वाजता बोलावली होती. परंतु आयत्या वेळेला त्यांनी ती रद्द केली. सर्व सचिवांचे आभार मानून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार अशा बातम्या होत्या. परंतु बैठक रद्द झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या मनसूब्याविषयी शंका तयार झाली. Sharad Pawar showing desperation to save the Thackeray government, but will prove in vain

– सरकार वाचविण्याचे पवारांचे आदेश

दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आणि निवडक नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत ठाकरे सरकार टिकवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी सध्या उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभी राहणार आहे. तसे आदेश शरद पवारांनी आम्हाला दिले आहेत, असे जयंत पाटील यांनी सांगितले. यातूनच सध्याचे ठाकरे सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस किती उतावीळ आहे हे दिसून आले.– उद्धव ठाकरेंना डिवचले

त्याच वेळी त्यांनी शिवसेनेचे आमदार टिकवता येत नाहीत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सौम्य शब्दात डिवचून घेतले. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध राहिला बाकीच्या पक्षांची मते फुटली हे जयंत पाटील यांनी लक्षात आणून दिले.

– राष्ट्रवादी सर्वाधिक लाभार्थी

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक लाभार्थी ठरली. त्या खालोखाल काँग्रेस लाभार्थी झाली. शिवसेनेवर अन्याय झाला हा शिंदे गटाच्या आमदारांचा मुख्य आक्षेप आहे. तो आक्षेप सर्व आमदारांनी उघडपणे वारंवार बोलून दाखवला असताना त्यावर मात्र जयंत पाटील यांनी गुळमुळीत भाष्य केले आहे. काही लोकांची कामे झाली नसतील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांची कामे झाली नाहीत. परंतु त्यामुळे त्यांनी पक्षाविषयी अथवा पक्षनेतृत्वा विषयी नाराजी व्यक्त केली नाही, अशा शब्दात त्यांनी शिवसेना नेतृत्वाला टोचून घेतले आहे. पण एवढे करूनही हे सरकार टिकावे असेच आदेश आम्हाला शरद पवार यांनी दिल्याचे जयंत पाटील यांनी म्हटल्यानंतर एकटी राष्ट्रवादीच उद्धव ठाकरे यांच्या मागे उभे राहिल्याचे स्पष्ट होत आहे.

– शिंदे गटाचा आरोप सिद्ध

शिवाय जयंत पाटील यांच्या वक्तव्यातून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांचा मुख्य आरोप देखील सिद्ध होत आहे तो म्हणजे राष्ट्रवादीच सध्याच्या ठाकरे सरकारचे सर्वाधिक लाभार्थी ठरले आणि म्हणूनच हे सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस घायकुतीला आल्यासारखे राजकीय वर्तन करताना दिसत आहे.

– राष्ट्रवादी एकसंध पण…

पण याचा दुसरा अर्थ असा की एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असली तरी पक्ष म्हणून महाविकास आघाडीत ती एकाकी पडली आहे. काँग्रेस सध्या थंड आहे. त्यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटात शिवसेनेचे आमदारच उरलेले नाहीत. जे उरले आहेत, त्यांची संख्या फक्त 14 आहे!!

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सध्याचे ठाकरे सरकार टिकवण्यासाठी जेवढे उतावीळ प्रयत्न करेल तेवढा शिंदे गटाचा विरोध देखील तीव्र होत जाईल. त्यातून सरकार टिकण्याऐवजी जास्तीत जास्त वेगाने कोसळण्याच्या दिशेने जाईल.

शिवसेना आमदारांची बैठक होणार होती, ती रद्द झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार होती. ती देखील रद्द झाली याचा सरळ अर्थ असा आहे की या बैठका रद्द कराव्या लागल्या आहेत. कारण या बैठकांमधून जर आमदारांनी प्रश्न उपस्थित केले असते तर त्याची उत्तरे शिवसेना अथवा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे नव्हती असाच कयास राजकीय निरीक्षक लावत आहेत. आणि त्यात राजकीय परिस्थितीजन्य तथ्य आहे.

Sharad Pawar showing desperation to save the Thackeray government, but will prove in vain

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!