कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा; एकीकडे पवार म्हणतात, केंद्राचे राज्याला सहकार्य; दुसरीकडे राजेश टोपेंचे पुन्हा केंद्रावर आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई – कोरोना लसीच्या पुरवठ्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमधलीच विसंगती आता पुढे आली आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केंद्राचे राज्याला सहकार्य असल्याची ग्वाही दिली आहे. तर दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लस पुरवठ्यावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. राज्याला लसीचा पुरवठा कमी असल्याचा त्यांनी दावा केला आहे.sharad pawar says, central govt is cooprating state govts, rajesh tope accused centre of less supply of corona vaccine

राजेश टोपे यांनी मर्यादीत लस साठ्यासंदर्भात भाष्य केल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी लशीचा तुटवडा असल्याची नाहक भीती निर्माण करत आहेत. राज्यांकडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका केली. त्यामुळेच आता लसीकरणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र तसेच दिल्ली सरकारविरुद्ध केंद्र असा वाद निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्याचवेळी शरद पवार यांनी बुधवारी (७ एप्रिल २०२१ रोजी) केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना सांगितले.केंद्र सरकार या संकटाच्या काळात सर्व राज्यांच्या पाठीशी असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की केंद्र सरकार या संकटाच्या काळामध्ये राज्य सरकारला मदत करण्याची भूमिका घेत आहे. कालच मी देशाच्या आरोग्यमंत्र्यांशी संपर्क साधला. या वेळेस ज्या काही कमतरता आहेत त्याबद्दलच्या चर्चा मी केल्या. त्यांनी एक विश्वास दिला की केंद्र सरकार, केंद्र सरकारचे आरोग्य खाते या संकटामध्ये राज्यांच्या पाठीशी आहे, महाराष्ट्राच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्यांची मदत आणि आपले सामूहिक प्रयत्न यातून आपल्याला पुढे जायचे आहे मार्ग काढायचा आहे.

sharad pawar says, central govt is cooprating state govts, rajesh tope accused centre of less supply of corona vaccine

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*