ठाकरे – आंबेडकर युती; पण महाविकास आघाडीचा वंचित आघाडीशी संबंध शरद पवारांनी फेटाळला!!


प्रतिनिधी

मुंबई : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी युती केली आहे. पण महाविकास आघाडीचा वंचित आघाडीशी संबंध राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी फेटाळून लावला आहे. शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.Sharad Pawar rejected mahavikas Aghadi’s connection with Vanchit Aghadi

आम्ही वंचित बहुजन आघाडीशी कोणतीही चर्चा केलेली नाही, असे स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार यांनी केले आहे. आगामी निवडणुकांना आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहोत, मात्र वंचित बहुजन आघाडीशी कोणतीही चर्चा झालेली नाही, आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत एकत्र आहोत, असेही शरद पवार म्हणाले.



स्वतः प्रकाश आंबेडकरांनी देखील आपली युती शिवसेनेबरोबर झाली आहे. महाविकास आघाडीची त्याचा संबंध नाही, असा खुलासा आधीच केला आहे. पवारांनी आंबेडकरांच्या वक्तव्याला स्वतःच्या वक्तव्यातून दुजोरा दिला आहे.

पहाटेच्या शपथविधीवर बोलणे टाळले

तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून जनतेच्या अधिकारांवर गदा आणली जात असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवर केलेल्या वक्तव्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. यावर प्रश्न केला असता पवार म्हणाले, पहाटेच्या शपथविधीला आता दोन वर्ष होऊन गेली आहेत तो प्रश्न आता कशाला काढायचा??, असे उत्तर पवारांनी दिले.

Sharad Pawar rejected mahavikas Aghadi’s connection with Vanchit Aghadi

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात