विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या दोन वज्रमूठ सभा झाल्या आहेत. त्यामध्ये मुख्य वक्ते म्हणून उद्धव ठाकरे यांनीच सभेला संबोधित केले आहे. परंतु 1 मे रोजी मुंबईत वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये होणाऱ्या वज्रमूठ सभेत स्वतः शरद पवार उपस्थित राहून जनतेला संबोधित करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण आता शरद पवार एकाही वज्रमूठ सभेला उपस्थित राहणार नसल्याची बातमी सूत्रांच्या हवाल्याने पुढे आली आहे.Sharad Pawar is national leader, he will not attend any regional MVA vajramooth sabha in maharashtra
महाविकास आघाडी 2024 ची निवडणूक एकत्रित लढविणार की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही, असे अमरावतीत वक्तव्य करून शरद पवारांनी कालपासून महाराष्ट्रात खळबळ निर्माण केली होती. त्याचा त्यांनी आज खुलासा केला. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचे शरद पवार म्हणाले. महाविकास आघाडी टिकवून ठेवण्याचाच आपला प्रयत्न असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.
मात्र शरद पवार महाविकास आघाडी टिकवून ठेवण्याचा निर्वाळा देत असतानाच सूत्रांच्या हवाल्याने एक वेगळीच बातमी समोर आली, ती म्हणजे शरद पवार आता महाविकास आघाडीच्या एकाही वज्रमूठ सभेला उपस्थित राहणार नाहीत. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत आणि महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा ही फक्त महाराष्ट्रात होत असते. त्यामुळे त्या सभेला महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे प्रत्येकी दोनच नेते संबोधित करतील असे ठरले आहे, असे सूत्रांनी सांगितल्याचे टीव्ही 9 मराठीच्या बातमीमध्ये नमूद केले आहे.
एकीकडे शरद पवारांनी महाविकास आघाडी संदर्भात केलेल्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केल्याचे म्हटले आहे, तर दुसरीकडे शरद पवार हे राष्ट्रीय नेते असल्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रादेशिक वज्रमूठ सभांना उपस्थित राहणार नाहीत, अशी बातमी आल्याने पवारांच्या एकूण राजकीय भूमिकेविषयी पुन्हा एकदा संशय निर्माण झाला आहे.
प्रादेशिक पक्षाचे राष्ट्रीय नेते
त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने निवडणूक परफॉर्मन्सच्या निकषावर काढून घेऊन प्रादेशिक पक्षाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे पक्षाचा राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवत आहे. तेथे निवडणूक आयोगाच्या निकषानुसार काही विशिष्ट टक्के मते मिळवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी देखील शरद पवारांची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार हे राष्ट्रीय नेते असल्याने ते महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांना उपस्थित राहणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App