पक्ष फुटीमुळे उद्धव ठाकरेंनी सत्ता गमावली; पण तशाच पक्ष फुटीमुळे शरद पवार सत्ता कमावणार कशी??


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना पक्ष फुटल्यामुळे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची सत्ता गमावली आणि आता शरद पवारांनी अजितदादांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वकांक्षा आणि राष्ट्रवादीतील संभाव्य फूट यावर अमरावतीत भाष्य केले आहे. ज्यांना कुणाला पक्ष फोडायचा ते फोडू शकतात. मग आम्ही आमची भूमिका घेऊ, असा इशारा शरद पवारांनी दिला आहे. पवारांनी दिलेल्या या इशाऱ्याचे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अर्थ काढले जात आहेत. पवारांनी एकाच इशाऱ्यातून भाजप आणि अजितदादांकडे अंगुली निर्देश केल्याचे बोलले जात आहे. पण त्या पलीकडे जाऊन पवारांच्या इशाऱ्याचे विश्लेषण केले, तर शीर्षकाचा अर्थ समजून येईल. Uddhav Thackeray lost power due to split in Shivsena, but sharad Pawar had always grabbed the power by splitting parties

शिवसेनेत फूट पडल्यामुळे खरंच उद्धव ठाकरेंना आपली सत्ता गमवावी लागली. पण शरद पवारांचा गेल्या 50 – 55 वर्षांचा राजकीय अनुभव लक्षात घेता त्यांनी पक्षांमध्ये फूट काढून नेहमीच सत्ता कमावण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो इतिहास 1978 पासूनचा आहे.

1978 मध्ये शरद पवारांनी काँग्रेस फोडली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा लाभ पदरात पाडून घेतला. त्यासाठी त्यांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा कायमचा ठपकाही लावून घेतला. पण काँग्रेस फोडून त्यांनी सत्ता हसिल केलीच. 1999 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस फोडून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. भले त्यांनी निवडणुकीमध्ये काँग्रेसची राजकीय वैर केले, पण सत्तेचा सोपान चढण्याची शक्यता तयार होताच त्यांनी पुन्हा काँग्रेस बरोबरच हातमिळवणी केली. 1999 ते 2014 पर्यंत पवारांनी काँग्रेस बरोबर महाराष्ट्रावर सत्ता चालवली.


सावरकर मुद्द्यावर काँग्रेसशी पंगा, अदानी मुद्द्यावर राष्ट्रवादीशी टक्कर!!; उद्धव ठाकरेंची होणार स्वतंत्र पत्रकार परिषद


2014 मध्ये संपूर्ण पराभव झाल्यामुळे फारशी जोडतोड पवारांना जमली नाही आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने आपल्या मनात नसलेला मुख्यमंत्री पाच वर्षे सहन करावा लागला. पण 2019 मध्ये त्यांनी शरद पवारांनी कुठला पक्ष फोडला नाही, तर थेट संपूर्ण शिवसेना पक्षच भाजप पासून तोडून महाविकास आघाडी स्थापन करून राष्ट्रवादीचा सत्तेचा वाटा मिळवला. पण तो अडीच वर्षेच टिकला आणि आता जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस गेली 9 महिने सत्ते बाहेर आहे तेव्हा पक्ष फुटीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

9 महिन्यांपूर्वी शिवसेना फुटली म्हणून उद्धव ठाकरेंना सत्ता गमवावी लागली, पण आता अजितदादांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा उफाळून येऊन जेव्हा राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर आहे, तेव्हा शरद पवार कशी सत्ता कमावणार??, याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. कारण पक्ष फुटीतून अथवा जोडतो सत्ता कमावणे हेच पवारांचे वैशिष्ट्य राहिले आहे. येथे सुद्धा राष्ट्रवादी फोडून अजितदादा आपली वेगळी चूल मांडणार असतील तरी कोणत्या का होईना, “पवारांना”च सत्तेचा वाटा त्यातून मिळणार आहे आणि त्या सत्तेच्या वाट्यातून जे उपवाटे तयार होतील, त्याचा लाभ पवारांच्या अनुयायांना होणार आहे. या दृष्टीने देखील ज्यांना पक्ष फोडायचा ते फोडू शकतात, मग आम्ही आमची भूमिका घेऊ, या शरद पवारांच्या वक्तव्याकडे पहावे लागेल. कारण गेल्या 50 – 55 वर्षांमधला शरद पवार यांचा राजकीय अनुभव पक्ष फुटीतून आणि जोडतोडीतून फक्त आणि फक्त सत्ता लाभ असाच सांगतो आहे!!

Uddhav Thackeray lost power due to split in Shivsena, but sharad Pawar had always grabbed the power by splitting parties

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात