Raut – Pawar : कोल्हापूरच्या निकालाची उताविळी; महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीचे टोमणे – इशारे आणि “आमंत्रणे”!!


राणा दांपत्य आणि शिवसेना यांच्यासंघर्षात आज पुन्हा एकदा महाराष्ट्राचा राष्ट्रपती राजवटीने चर्चेचा जोर धरला. वास्तविक कालच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती राजवट लावावी ही जनभावना आहे. पण भाजपची तशी मागणी नाही, असे स्पष्ट केले होते. तरीदेखील आजच्या सकाळच्या नियमित पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी राष्ट्रपती राजवटीचा विषय उकरून काढला राष्ट्रपती राजवट लावायचे असेल तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात एकत्र राष्ट्रपती राजवट लावा असा टोमणा त्यांनी भाजपला लगावला. भाजपचे एक शिष्टमंडळ नुसते दिल्लीत दाखल झाले. केंद्रीय गृह सचिवांची या शिष्टमंडळाने भेट घेतली तर संजय राऊत यांचा तिळपापड झाल्याने त्यांनी राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा उकरून काढला. Sharad Pawar himself “inviting” president rule in maharashtra

उत्तर प्रदेशात देखील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे त्याचे अनावश्यक बुलडोझर चालवले जात आहेत. त्यामुळे तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर लावणार असतात तर उत्तर प्रदेशातही लावून टाका, असा टोमणा त्यांनी भाजपला लावला, तर दुसरीकडे शरद पवारांनी राष्ट्रपती राजवट या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाला इशारा इशाऱ्यात उत्तर दिले. राष्ट्रपती राजवट लावून निवडणुकाच आणायच्या असतील तर कोल्हापूरच्या निवडणूक निकालाने निवडणुकीचे “निकाल” दाखवून दिले आहेत, असा इशारा शरद पवारांनी दिला. पण त्याच वेळी राष्ट्रपती राजवटीचे टोकाचे पाऊल कोणी उचलणार नाही, असेही ते म्हणाले…!!



पण ज्याअर्थी शरद पवारांनी एखादे “सकारात्मक” विधान केले, तर ते “नकारात्मक” रीतीने घ्यायचे असते आणि एखादे “नकारात्मक” विधान केले तर ते “सकारात्मक” पद्धतीने साकार होताना दिसते तसेच शरद पवारांचे हे विधान आहे का…?? महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावीच असे “आमंत्रण” तर देत नाहीत ना…??, असा प्रश्न पडतो आहे.

राष्ट्रवादीचा कोल्हापूरचा संकल्प मेळावा यशस्वी झाल्याचा त्या पक्षाचा दावा आहे. भले मग त्या मेळाव्याला महाराष्ट्रातल्या मीडियाने फारसे स्थान दिले नसेल, पण पवारांना मात्र या मेळाव्याच्या यशाची आणि कोल्हापूरच्या निवडणुकीत लागलेल्या निकालाची “खात्री” पटली आहे. त्यामुळेच ते राष्ट्रपती राजवट लावण्याच्या टोकाला कोणी जाणार नाही, असे वक्तव्य करीत आहेत का…??, हा खरा कळीचा प्रश्न आहे.

बाकी शरद पवारांच्या वक्तव्यात नेहमीचाच मुद्दा होता. फडणवीसांना त्यांनी टोमणा मारून घेतला. जे नेते पुन्हा येऊ शकले नाहीत, ते नेते अस्वस्थ आहेत. पण सत्ता गेली तरी अस्वस्थ व्हायचे नसते असे सांगताना त्यांनी स्वतःच्या 1980 च्या सत्ता बरखास्तीचे उदाहरण दिले. त्यावेळी रात्री साडेबारा वाजता सरकार बरखास्त झाल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिल्यानंतर आपण रात्रीत सामान आवरून दुसरीकडे राहायला गेलो. सकाळी भारत-इंग्लंड मॅच पहिला वानखेडे स्टेडियम वर जाऊन दिवसभर मॅच “एन्जॉय” केली, असे ते म्हणाले. पण पवारांनी सांगितलेले “सत्य” हे तेवढेच “सत्य” होते का…?? पवारांचे त्यावेळेचे सहकारी सत्ता गेली तरी तितकेच “एन्जॉय” करत होते का…??₹ हा खरा प्रश्न आहे…!!

पण पवारांच्या वैयक्तिक अनुभवा पलिकडे सध्या नेमके कोण अस्वस्थ आहे…?? आपले सहस्रचंद्रदर्शन ओलांडून गेल्यानंतर पक्षाला नंबर 1 बनवण्याचा संकल्प कोणी केला आहे…?? आणि कोल्हापूर येथे लागलेल्या निकालाच्या उत्साही उताविळीने राष्ट्रपती राजवटीला नेमके “आमंत्रण” कोण देते आहे…?? हे मात्र महाराष्ट्राच्या लक्षात येत असल्या शिवाय राहत नाही…!!

Sharad Pawar himself “inviting” president rule in maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात