प्रतिनिधी
नवी दिल्ली : शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात आहे, अशा शब्दांत शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी थेट हल्लाबोल केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएने आयोजित केलेल्या बैठकीत शिंदे गटाकडून सहभागी होण्यासाठी दीपक केसरकर दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यावेळी “एबीपी माझा”शी बोलताना त्यांनी थेट शरद पवारांवर शरसंधान साधले आहे. Sharad Pawar hand behind every split of Shiv Sena Deepak Kesarkar
– दीपक केसरकर म्हणाले :
– शिवसेनेच्या आधीच्या प्रत्येक फुटीमध्ये शरद पवारांचा हात आहे. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना यातना का दिल्या?, हे शरद पवार यांना जनतेला सांगावे लागेल.
– शरद पवार यांनी अनेकदा खासगीत बोलताना शिवसेनेच्या फुटीबाबत सांगितले आहे. नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी पवारांनी मदत केली होती. मात्र, राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती, असेही पवारांनी सांगितले होते. छगन भुजबळ यांना स्वत:च शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर नेले. राज ठाकरे यांच्या पाठिशी शरद पवार यांचे आशीर्वाद होते.
– गेल्या 2.5 वर्षात राष्ट्रवादीला टॉनिक मिळाले आहे. राष्ट्रवादीचे नेते स्वबळावर सत्ता आणण्याचे प्रयत्न करत आहेत. ते जाहीरपणे तसे बोलतही आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेच्या पालखीचे भोई होणे शिवसैनिकांना पटणार आहे का??, याचा विचार शिवसैनिकांनी करावा.
– शिवसेनेतला मी शेवटचा मनुष्य असलो तरी काँग्रेससोबत जाणार नाही असे बाळासाहेब म्हणाले होते. काँग्रेससोबत जाणे ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली नाही. हिंदुत्वाची भूमिका मांडणाऱ्या भाजप बरोबर आम्ही आलो आहोत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App