विनायक ढेरे
नाशिक: केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपचे बहुमताचे सरकार आल्यानंतर काहीच दिवसांतच देशात “असहिष्णू” वातावरण पसरल्याची हाकाटी पिटत विचारवंत साहित्यिकांनी जी अवॉर्ड वापसीची मोहीम चालवली होती, त्याचीच “लघु आवृत्ती” आज महाराष्ट्रात निघाली आहे.”Selected” marathi writers meet Uddhav Thackeray and support his faction of Shivsena
महाराष्ट्रातील “निवडक” साहित्यिकांनी बाळासाहेबांच्या नव्हे तर उद्धवजींच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा देण्यासाठी त्यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे. हे तेच साहित्यिक आहेत, की जे बाळासाहेब असताना शिवसेनेच्या सावलीला देखील उभे राहत नव्हते!!
उद्धव ठाकरे यांना आज भेटायला जाणाऱ्यांमध्ये अर्जुन डांगळे, कवी नीरजा, मेधा कुलकर्णी, कवी अरुण म्हात्रे, डॉ. महेश केळुसकर आदींचा समावेश होता. एक प्रकारे हे शिवसेनेला उद्धवजींच्या शिवसेनेला नवा “वैचारिक टेकू” लावण्यासारखेच आहे.
#शिवसेनेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील निकाल देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरविणारा असेल …@OfficeofUT @shivsena पक्षप्रमुखांचे कार्य व लढा गौरवास्पद !आज व ऊद्याही सोबत रहाणारसाहित्यिकअर्जुनडांगळे व@MedhaKulkarni,नीरजा, @MaheshKeluskar@hemantkarnik @Abhyasu_MH यांचे विचार pic.twitter.com/jMI0FzZQ7x — Dr Neelam Latika Diwakar Gorhe (@neelamgorhe) August 14, 2022
#शिवसेनेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील निकाल देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरविणारा असेल …@OfficeofUT @shivsena पक्षप्रमुखांचे कार्य व लढा गौरवास्पद !आज व ऊद्याही सोबत रहाणारसाहित्यिकअर्जुनडांगळे व@MedhaKulkarni,नीरजा, @MaheshKeluskar@hemantkarnik @Abhyasu_MH यांचे विचार pic.twitter.com/jMI0FzZQ7x
— Dr Neelam Latika Diwakar Gorhe (@neelamgorhe) August 14, 2022
राष्ट्रवादीतून नेत्यांचा पुरवठा
राष्ट्रवादीतून आधीच उद्धवजींच्या सेनेला नेत्यांचा पुरवठा केला गेलाच आहे. यामध्ये सुषमा अंधारे यांच्यासारख्या प्रवक्त्यांचा समावेश आहे आता त्या पलिकडे जाऊन निवडक साहित्यिकांना शिवसेनेच्या गोटात पाठवून राष्ट्रवादीने उद्धवजींच्या सेनेला वैचारिक पातळीवरही पुरती गुंडाळण्याचा पुढचे पाऊल टाकल्याचे दिसून येत आहे.
या निवडक साहित्यिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यामागे देशात “स्वातंत्र्याची गळचेपी” होते आहे, अघोषित आणीबाणी लागू आहे, वगैरे कारणे दिली आहेत. ती अर्थातच 2015 सालच्या देशभरातल्या अवॉर्ड वापसी मोहिमेचीच कारणे आहेत. यामध्ये नवे मुद्दे कोणतेच उपस्थित करण्यात आलेले नाहीत. पण उद्धवजींनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करून जी “वैचारिक क्रांती” केली त्या “क्रांतीला” पाठिंबा देण्यासाठीच “निवडक” साहित्यिक त्यांच्या भेटीला मातोश्रीवर पोहोचले होते. अर्थातच या साहित्यिकांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेला कधीच पाठिंबा नव्हता. पण आता उद्धवजींच्या सेनेला पाठिंबा देऊन ते हिंदुत्ववादी शिवसेनेत संघटनात्मक पातळी पातळीवर आधीच पडलेल्या फुटीवर “वैचारिक पाचर” मारण्याचा प्रयत्न करत आहेत!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App