वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय वर छापेमारीची आज दुसरी फेरी सुरू झाली आहे. दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम सह अनेक राज्यांमध्ये मध्यरात्रीपासूनच राष्ट्रीय तपास संस्था एनआयए आणि संबंधित राज्यांच्या स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम्स अर्थात एसआयटी हे संयुक्तपणे छापेमारी करून पीएफआय आणि सोशल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ इंडिया अर्थात एसडीपीआयच्या म्होरक्यांना ताब्यात घेत आहे. कर्नाटक मध्ये मेंगलोर, बंगलुरु या शहरांमधून 75 जणांना कर्नाटक एटीएसने ताब्यात घेतले आहे. दिल्लीत शाहीन बाग, निजामुद्दीन परिसर त्याचबरोबर अन्य ठिकाणी छापे सुरू आहेत. महाराष्ट्रात देखील संभाजीनगर सोलापुरात छापे घालून काही जणांना ताब्यात घेतले आहे.Second round of raids on PFIs across India today; NIA-ATS action in many states including Delhi, Maharashtra, Karnataka!!
औरंगाबाद आणि सोलापूरमधून पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या म्होरक्यांना एटीएस आणि एनआयएने ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच पीएफआयच्या कार्यालयांवर देशभरात छापेमारी झाली होती. जवळपास 100 जणांना अटकही करण्यात आली होती. सोमवारी मध्यरात्री तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा कारवाई केली आहे.
औरंगाबादमध्ये कारवाई
औरंगाबाद एटीएस आणि पोलिसांनी मोठी कारवाई करत पीएफआयचे आणखी 13 ते 14 कार्यकर्ते ताब्यात घेतले. एकाच वेळी पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. औरंगाबाद पोलीस आणि एटीएसने रात्रभर छापमेमारी केली.
सोलापूरातून एकजण ताब्यात
सोलापूरमधूनही PFI विरोधात एनआयएने कारवाई केली आहे. सोलापूरमधून NIA च्या पथकाने ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्याला आपल्यासोबत चौकशीसाठी दिल्लीला नेले असल्याची माहिती आहे.
पीएफआय या संघटनेवर काय आरोप?
पीएफआय ही संघटना देशविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. 2047 पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचे त्यांचे उद्धिष्ट असल्याचा दावा तपास अधिका-यांनी केला. पीएफआयकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपच्या पदाधिका-यांच्या हत्येचा कट आखला असल्याचेही अधिका-यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App