मोठी बातमी : मुंबई-ठाण्यानंतर आता पुण्यातही इयत्ता १ली ते ८वीपर्यंतच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद, वाढत्या कोरोना संसर्गानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

Schools from 1st to 8th class in Pune district closed till January 30, Deputy Chief Minister Ajit Pawar announced after increasing corona infection

Deputy Chief Minister Ajit Pawar : राज्यात कोरोना संसर्गामध्ये झपाट्याने वाढ होत असून यामुळेच मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर आता पुण्यातही वाढत्या रुग्णसंख्येमुळे इयत्ता १ली ते ८वीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. Schools from 1st to 8th class in Pune district closed till January 30, Deputy Chief Minister Ajit Pawar announced after increasing corona infection


वृत्तसंस्था

पुणे : राज्यात कोरोना संसर्गामध्ये झपाट्याने वाढ होत असून यामुळेच मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर आता पुण्यातही वाढत्या रुग्णसंख्येमुळे इयत्ता १ली ते ८वीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, पुण्यात आज कोरोनाचे 1104 रुग्ण आढळले आहेत. पुण्याचा सकारात्मकता दर 18 टक्क्यांवर गेला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील इयत्ता १ली ते ८वीपर्यंतच्या शाळा या दि. ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिका हद्दीतील तसेच पिंपरी चिंचवडचाही यात समावेश आहे. शाळा प्रत्यक्षात बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे या काळात ऑनलाइन शिक्षण मात्र सुरूच ठेवण्यात येणार आहे.

अजित पवार पुढे म्हणाले की, कोरोना नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. मास्क, सुरक्षित अंतर राखणे, वारंवार हात सॅनिटाइज करणे हेही आवश्यक आहे. उद्यापासून पुण्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांना ५०० रुपये दंडाची सुरुवात होत आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याला १ हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Schools from 1st to 8th class in Pune district closed till January 30, Deputy Chief Minister Ajit Pawar announced after increasing corona infection

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था