राज्यात सोमवारपासून पुन्हा वाजणार शाळेची घंटा!!; पहिली ते बारावीचे वर्ग भरणार


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये पुन्हा कधी सुरू होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे. येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय दिला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय घेतला गेला. शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती देताना असे म्हटले की, सोमवारी 24 जानेवारीपासून शाळा सुरु होतील. School bell to ring again in the state from Monday !!; 1st to 12th class will be filled

महाविद्यालये सुरू करण्याचा प्रस्तावही मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. त्याला मंजुरी मिळाली की महाविद्यालय सुरू करण्यात येतील, असे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.वर्षा गायकवाड म्हणाल्या, 24 तारखेपासून शाळा सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे आम्ही विनंती केली होती. त्याप्रमाणे शाळा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमची मागणी मान्य केली आहे. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील. सोमवारी 24 जानेवारीपासून शाळा सुरु होतील. पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शाळा सुरू करत असताना मागील दोन वर्षांपासून आपण कोरोनाशी मुकाबला करत आहोत. मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता राहिलेली आहे. स्थानिक स्थितीवर लक्ष ठेवलं पाहिजे. कोरोना स्थितीचा आढावा घेतला पाहिजे. शाळा सुरु करत असताना आपण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग पाहत आहोत. त्यामुळं शाळा सुरु करत असताना नियमावलीचं पालन केलं पाहिजे. पूर्णपणे काळजी घेऊन शाळा सुरु करण्यात याव्यात, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

School bell to ring again in the state from Monday !!; 1st to 12th class will be filled

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!