महाराष्ट्रात मुख्यमंत्री असलेल्या सत्ताधारी शिवसेनेत दोन-तृतीयांश फूट पाडून एकनाथ शिंदे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्याच राजकीय पावलावर आपले राजकीय पाऊल टाकले आहे!! SBT – YSR Congress : eknath shinde followed footsteps of ysr jaganmoh reddy to rename his party Shivsena Balasaheb Thackeray
वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी जसा आपल्या पित्याचा आणि काँग्रेसचा राजकीय वारसा “वायएसआर काँग्रेस” मध्ये सामावून घेऊन दाखविला, तसाच काहीसा प्रकार आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदार गटाचे नाव “शिवसेना बाळासाहेब ठाकरे” असे ठेवून केला आहे वाय. एस. जगनमोहन रेड्डी आणि एकनाथ शिंदे यांनी आपापल्या पित्यांचाच वारसा चालवला आहे!!, फक्त फरक एवढा आहे की वाय. एस. राजशेखर रेड्डी हे जगनमोहन रेड्डी यांचे प्रत्यक्ष पिता होते, तर बाळासाहेब ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचे वैचारिक पिता आहेत.
खऱ्या पित्याचा वारसा ते वैचारिक वारसा
जगन मोहन रेड्डी यांनी आपल्या पित्याचा बलदंड वारसा ओळखला आंध्रा मध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आपल्या वडिलांच्या नावावर मते मागून आंध्रप्रदेश आवर संपूर्ण सत्ता मिळवली एकनाथ शिंदे यांची मात्र ही सुरुवात आहे त्यांनी आपल्या पक्षाच्या नावांमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ही दोन्ही नावे वापरून वैचारिक वारसा आपल्याकडे जरूर खेचून घेतला आहे पण तो आता राजकीय दृष्ट्या त्यांना ब्रँड म्हणून एस्टॅब्लिश करावा लागेल बाळासाहेब ठाकरे यांचा जो राजकीय वैचारिक वारसा दस्तुरखुर्द त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना ओळखता आला नाही, तो राजकीय वैचारिक वारसा एकनाथ शिंदे यांनी व्यवस्थित ओळखला आहे आपल्या पक्षाचे नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे ठेवण्यामागे त्यांचा हाच वैचारिक राजकीय वारसा चालवण्याचा विचार दिसत आहे यामध्ये ते किती यशस्वी होतात हे आगामी काळात ठरणार आहे.
उद्धव यांच्या राजकीय चलाखीवर मात
बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आम्ही सोडणार नाही. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, हे एकनाथ शिंदे बंड केल्याच्या पहिल्या दिवसापासून सांगत होते. तेच त्यांनी आता आपल्या गटाचे नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे ठेवून सिद्ध केले आहे!! एकनाथ शिंदे हे आपल्या गटाच्या नावात शिवसेना आहे वापरणार याची खात्री असल्यामुळेच कालच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना आणि त्यांच्याबरोबर असलेल्या आमदारांना तुमच्या नावातून शिवसेना आणि हे ठाकरे नाव वगळून दाखवा आणि जगून दाखवा, असे आव्हान दिले होते. मात्र या आव्हानातली राजकीय चलाखी एकनाथ शिंदे यांनी पुरती ओळखून त्यावर मात केल्याचे दिसत आहे.
– एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत सातत्य
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जी राजकीय भूमिका जाहीर केली होती, त्या भूमिकेत सातत्य ठेवले आहे. शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे. भाजपशी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती करून सरकार स्थापन करावे. बंडखोर आमदारांनी शिवसेना सोडलेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडलेले नाही. हे मुद्दे एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच दिवशी म्हणजे 21 जून 2022 रोजी मांडले होते. ते आज 25 जून 2022 रोजी देखील कायम आहेत. त्या भूमिकेत तसूभरही फरक पडलेला नाही. त्यातूनच आपले वैचारिक पिता बाळासाहेब ठाकरे यांचे नाव त्यांनी आपल्या पक्षात वापरले आहे आणि त्यांनीच स्थापन केलेल्या शिवसेना या पक्षाचे नाव देखील वापरले आहे.
– आता दोन शिवसेना राजकारणात
त्यामुळे इथून पुढे शिवसेना नावाचे दोन पक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात असतील एक शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि दुसरा शिवसेना उद्धव ठाकरे!!
– भुजबळ, राणे, राज यांना जमले नाही ते
महाराष्ट्राच्या राजकारणाने या अर्थाने नवे वळण घेतले आहे. जे शिवसेनेतल्या पहिल्या बंडाच्या वेळी छगन भुजबळांना जमले नाही, दुसऱ्या बंडाच्या वेळी नारायण राणे यांना जमले नाही, तिसऱ्या बंडाच्या वेळी राज ठाकरे यांना जमले नाही… ते एकनाथ शिंदे नावाच्या तुलनेने कमी प्रसिद्ध असलेल्या आणि तुलनेने कमी ताकद आहे असे प्रसार माध्यमे म्हणत असलेल्या नेत्याने करून दाखवले आहे!!
छगन भुजबळ 18 आमदार घेऊन बाहेर पडले होते त्यातले 6 परत गेले. नारायण राणे 11 आमदार घेऊन बाहेर पडले. राज ठाकरे यांनी आमदार फोडले नाहीत. पण एकनाथ शिंदे सध्या तरी मूळ शिवसेनेचे 38 आमदार घेऊन बाहेर पडले आहेत, हेच स्पष्ट होत आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App