विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मोदी समाज यांच्या अपमानाचा मुद्दा आजही राजकीय चर्चेतून थांबायला तयार नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राजकीय चलाखीने राहुल गांधी आणि काँग्रेसला सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून बॅकफूटवर पाठवले असले, तरी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी मात्र राहुल गांधी यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. राहुल गांधी हे देशातल्या राजकारणातला आश्वासक आवाज आहेत. त्यांनी माफी मागू नये, असे वक्तव्य तुषार गांधी यांनी केले आहे.Savarkar – modi insult issue : tushar Gandhi supports rahul Gandhi, suggests him not to apologise
दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राजकीय पराभव करण्यासाठी आपण काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट कोणाच्याही पाठीशी उभे राहायला तयार आहोत, असे सांगितले. राहुल गांधींनी देशातले सर्व मोदी चोर कसे??, असा सवाल करून कोणत्याही समाजाचा अपमान केलेला नाही. तसेच आपण राहुल गांधी आहोत. राहुल सावरकर नव्हे, असे सांगून त्यांनी सावरकरांचाही अपमान केलेला नाही, तर त्यांनी ऐतिहासिक तथ्य मांडले आहे. कारण सावरकर हे ब्रिटिशांची माफी मागूनच तुरुंगातून सुटले, असा दावा तुषार गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी हे देशातला आश्वासक आवाज आहेत. देशात लोकशाही नांदण्यासाठी त्यांचे नेतृत्व आवश्यक आहे. त्यांनी अजिबात माफी मागू नये. कारण त्यांनी माफी मागितली तर त्यांनी सावरकर आणि मोदींचा अपमान केला हे सिद्ध होईल आणि संघाच्या राजकारणाचा विजय होईल. म्हणून त्यांनी माफी मागू नये. आपण संघाचा पराभव करण्यासाठी काँग्रेस समाजवादी अथवा कम्युनिस्ट या सर्वांच्या पाठीशी उभे राहायला तयार आहोत. आपण निवडणुकीच्या राजकारणात येणार नसलो तरी सक्रिय राजकारणात राहू, असेही तुषार गांधी यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App