सायंकाळच्या सुमारास पोवई नाका नजीकच्यासैनिक बँकेसमोर अचानक या डंपरला आग लागली. आग लागताच धुराचे लोट परिसरात पसरले.Satara: An asphalt truck suddenly caught fire at Powainaka
विशेष प्रतिनिधी
सातारा : काल (शनिवारी ) सायंकाळच्या सुमारास सातारा शहरातील सर्वात मोठे वर्दळीचे ठिकाणी असलेल्या पोवईनाक्यावर डांबराच्या ट्रकने अचानक पेट घेतला.त्यामुळे तेथील परिसरात गोंधळ निर्माण झाला.
दरम्यान वेळीच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर आग विझवण्यात आली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नेमकी घटना काय घडली
पारंगे चौकाकडून पोवई नाक्याच्या दिशेने (एमएच ५० एन ६२६२) हा १० चाकी डंपर डांबर मिश्रित खडी घेऊन येत होता. सायंकाळच्या सुमारास पोवई नाका नजीकच्यासैनिक बँकेसमोर अचानक या डंपरला आग लागली. आग लागताच धुराचे लोट परिसरात पसरले.
याबाबत तात्काळ अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली.नगरपालिकेच्या अग्निशमन दल या घटनेची माहिती मिळताच बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले.अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.याकाळात रस्त्यावर बघ्यांची गर्दी केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App