पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष त्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. राज्यातील शिवसेना व राष्ट्रवादीनेही तयारी चालवली आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोव्यात संजय राऊत पुन्हा जाणार असून तेथे तृणमूलसोबत चर्चा सुरू आहे. यावर भाष्य करताना पाटील म्हणाले की, संजय राऊत यांचं गोव्यात जे काही चाललं आहे, ते भाजपला पूरकच आहे. त्यामुळे ते चालू द्यावं. Sanjay Raut whatever is doing in Goa is for the benefit of BJP, State President Chandrakant Patil’s statement
प्रतिनिधी
कोल्हापूर : पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष त्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. राज्यातील शिवसेना व राष्ट्रवादीनेही तयारी चालवली आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोव्यात संजय राऊत पुन्हा जाणार असून तेथे तृणमूलसोबत चर्चा सुरू आहे. यावर भाष्य करताना पाटील म्हणाले की, संजय राऊत यांचं गोव्यात जे काही चाललं आहे, ते भाजपला पूरकच आहे. त्यामुळे ते चालू द्यावं.
पुढे ते म्हणाले की, संजय राऊतांनी माझ्या प्रकृतीची काळजी करू नये. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रेरणा घेऊन काम करतो, तिथे आमचा कान पकडण्याची पूर्ण व्यवस्था आहे. उलट संजय राऊतांनी राज्याकडे पाहावं. त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांत १० हजार लोकांचा सर्व्हे करावा. म्हणजे त्यांना कळेल की, गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री उपलब्ध नाहीत. ७० हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यात पेपर फुटी सुरू आहे. पेपर फुटीमुळे तरुण मुलांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, विमा मिळाला नाही, प्रोत्साहन अनुदान मिळालं नाही, कर्जमाफी मिळाली नाही, आणि असं असताना महाराष्ट्र चांगला चाललाय असं राऊतांचं म्हणणं असेल तर हे धक्कादायक आहे.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी, तब्येत बरी व्हावी ही आमची इच्छा आहे. मात्र राज्यात इतके प्रश्न आहेत की मुख्यमंत्र्याचा चार्ज दुसऱ्या कोणाकडे तरी देण्याची गरज आहे. तो कोणाकडेही द्या आमचं काही म्हणणं नाही संजय राऊत यांनी माझ्या आणि पक्षाच्या तब्येतीची काळजी करू नये. मुंबई बँकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाला मात्र शिवसेनेच्या उपाध्यक्ष झाला नाही राष्ट्रवादीच्या मागे लागून शिवसेना वारंवार तोंड फोडून घेत आहे. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी मतं लागतात याची गोळाबेरीज करण्याचा राष्ट्रवादीचा फक्त प्रयत्न आहे. पण शिवसेना असे प्रयत्न का करते कळत नाही, असंही ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App