संजय राऊत ईडीच्या ताब्यात; त्यांच्याबरोबरच सगळ्या टीकेचा रोख शरद पवारांवर!!; पवार यापुढे राऊतांची पाठराखण करतील??

नाशिक : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आज रविवारी सलग साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचनालय अर्थात ईडीच्या अधिकाऱ्यांनी दुपारी ताब्यात घेतले आहे. सकाळी 7.00 वाजल्यापासून संजय राऊत यांच्या भांडुप आणि दादरच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली त्यावेळे पासून शिवसेनेतला शिंदे गट आणि भाजप या नेत्यांच्या टीकेचा सर्व रोख संजय राऊत यांच्यावर तर आहेच, पण त्याचबरोबर किंबहुना त्यापेक्षा जास्त टीकेचा रोख शरद पवारांवर झालेला दिसतो आहे.Sanjay Raut in ED custody; Along with him, all criticism is directed at Sharad Pawar!!; Will Pawar support Raut anymore?

याचे कारण उघड आहे, संजय राऊत यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे नाव जेवढे वेळा घेतले नाही त्यापेक्षा जास्त वेळा शरद पवारांची भलामण केली आहे आणि शरद पवार देखील संजय राऊत यांची पाठराखण आत्तापर्यंत करत आले आहेत. अर्थात शरद पवारांचा राजकीय इतिहास पाहिला तर यापुढच्या काळात शरद पवार हे संजय राऊत यांची पाठराखण करतीलच याची कोणतीही शाश्वती देता येत नाही. याचा अनुभव कायदेशीर लढाईच्या दृष्टीने अनिल देशमुख आणि नवाब मलिक घेतच आहेत. ईडीच्या ताब्यात जोपर्यंत अनिल देशमुख आणि नवाब मलिक जात नव्हते तोपर्यंत शरद पवारांनी त्यांची कायमच पाठ राखण केली होती. आज जरी ते उघडपणे दोघांचे नाव घेत असले तरी कायदेशीर लढाईच्या बाबतीत मात्र देशमुख आणि मलिक हे एकाकीच पडल्याचे वास्तवात दिसून येत आहे. संजय राऊत यांच्या बाबतीत देखील फारसे काही वेगळे होईल, अशी शक्यता फार कमी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.शरद पवारांवर शरसंधान

शिवसेनेतल्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्या पाठोपाठ भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील संजय राऊत यांच्यावर बरोबरीने शरद पवारांवर शरसंधान साधले आहे. शरद पवारांच्या नादी लागून संजय राऊत यांनी शिवसेनेत फूट पाडली. शिवसेनेचे वाटोळे केले. आम्ही उद्धव साहेबांना राष्ट्रवादीबरोबर युती नको म्हणून सांगत होतो. परंतु त्यांनी संजय राऊत यांचे ऐकले, असे टीकास्त्र संजय शिरसाठ यांनी सोडले.

रामदास कदम यांचे टीकास्त्र

तर बाळासाहेब ठाकरे यांची शपथ कशाला वाहता?, शरद पवारांची शपथ घ्या!!, असा टोला रामदास कदम यांनी लगावला. संजय राऊत यांनी सकाळी ईडीचे छापे सुरू झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता. तसे ट्विट देखील त्यांनी केले होते. पण याच मुद्द्यावर रामदास कदम यांनी त्यांना घेतले आणि बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेण्याची संजय राऊत यांची लायकी नाही. बाळासाहेब ठाकरेंची शपथ कशाला घेता?, शरद पवारांची शपथ घ्या!!, असा टोला रामदास कदम यांनी लगावला.

शिवसेनेतून राष्ट्रवादीची भांडी कोण घासणार?

रामदास कदम यांच्या पाठोपाठ भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील संजय राऊत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना टोले हाणून घेतले. संजय राऊत आत मध्ये गेले तर आपली मुलाखत कोण घेणार?, अशी चिंता उद्धव ठाकरे यांना वाटते आहे. तशीच चिंता शरद पवारांनाही वाटते आहे. संजय राऊत आत मध्ये गेले तर शिवसेनेत राहून राष्ट्रवादी काँग्रेसची भांडी कोण घासणार?, याची चिंता शरद पवारांना असल्याचे टीकास्त्र अतुल भातखळकर यांनी सोडले आहे. शिवसेनेतल्या शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांच्या टीकेचा हा सगळा रोख संजय राऊत आणि शरद पवार यांच्यावर दिसून आला आहे. यामागे अर्थातच महाविकास आघाडीच्या प्रयोगात शरद पवारांनी संजय राऊत यांनी बजावलेली भूमिका कारणीभूत असल्याचे स्पष्ट दिसते आहे.

Sanjay Raut in ED custody; Along with him, all criticism is directed at Sharad Pawar!!; Will Pawar support Raut anymore?

महत्वाच्या बातम्या