शिवसेनेचे “नवे संजय राऊत” कोण??; सुषमा अंधारे की अन्य कोणी??; पण राऊतांचे “ग्लॅमर” त्यांना प्राप्त होईल??


नाशिक : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत ईडीच्या ताब्यात गेले आहेत. त्यांना लवकरच अटक होऊन कदाचित ईडी कोठडीत राहावे लागेल. अशा वेळी दररोजच्या पत्रकार परिषदेला शिवसेना आणि मराठी माध्यमे मुकतील. “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांना तर संजय राऊत नसल्यामुळे अक्षरशः चुकल्या चुकल्यासारखे वाटेल!! रोज सकाळी 9.00 वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या मुंबई किंवा दिल्लीतल्या घरात जमून शिवसेनेच्या स्थानिक राजकारणापासून जागतिक राजकारणापर्यंत “उच्च दर्जाचे” प्रश्न विचारून “उच्च दर्जाची” उत्तरे घेण्याचे अन्हिक मराठी माध्यमांना येते काही दिवस तरी उरकता येणार नाही!!Shiv Sena’s “New Sanjay Raut”??; Sushma Andhare or anyone else??; But will they get Rauta’s “glamour”

 सुषमा अंधारे यांना शिवसेनेत का पाठवले??

मग शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून नवे संजय राऊत कोण असतील?? कोणाला ती जबाबदारी देण्यात येईल??, अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे. सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना शरद पवारांनीच तिथे पाठवण्याची तरतूद केली आहे, अशा बातम्या दोन दिवस प्रसार माध्यमातून येत आहेत. याचा अर्थ संजय राऊत यांना ईडी लवकरच ताब्यात घेणार याची कुणकुण पवारांसह शिवसेनेच्या नेतृत्वाला लागली होती का??, मग आता सुषमा अंधारे या शिवसेनेसाठी “नव्या संजय राऊत” असतील का?? की ही जबाबदारी सुषमा अंधारे यांना वगळून उद्धव ठाकरे कदाचित राजन विचारे अथवा किशोरी पेडणेकर यांच्याकडे सोपवतील??, याची शिवसेना वर्तुळात चर्चा आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याचे खासदार राजन विचारे आजच उद्धव ठाकरे गटात अधिकृतपणे सामील झाले आहेत. मग या तीन नावांपैकी कोणी किंवा अन्य कोणीही शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून संजय राऊत यांच्या “भूमिकेत” दिसणार असण्याची शक्यता आहे.



पण संजय राऊत यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या भूमिकेला जी “झळाळी” प्राप्त करून दिली तशी “झळाळी” वर उल्लेख केलेल्या तिघांपैकी कोणी टिकवून ठेवेल का??, या विषयी देखील शंका आहे.

 नवाब मलिक ईडीच्या कोठडीत

या शंकेचे खरे कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दडले आहे. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते होते. संजय राऊत यांच्या खालोखाल तेच महाविकास आघाडीचे बाजू जोरकसपणे लावून धरत होते. संजय राऊत यांच्यासारखे दररोज ते देखील पत्रकार परिषदा घेऊन महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीची बाजू सावरून धरत होते. मात्र दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉन्ड्रिंग केल्या प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीच्या कोठडीत जावे लागले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते पदाची रया गेली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते आजही पत्रकार परिषदा घेतात. पण नवाब मलिक यांना मराठी माध्यमांमध्ये जे “ग्लॅमर” होते ते त्यांना प्राप्त करून देता आले नाही.

संजय राऊतांचे “ग्लॅमर” कोणाला येईल??

मग संजय राऊत ईडीच्या कोठडीत गेल्यानंतर शिवसेनेचे “नवे संजय राऊत” ते “ग्लॅमर” शिवसेनेला प्राप्त करून देऊ शकतील का?? अशी शंका कोणाला आले तर ती अवास्तव मानता येणार नाही. पण संजय राऊत यांच्या ईडीच्या ताब्यात जाण्याने शिवसेनेतले “नवे संजय राऊत” कोण असतील??, ही चर्चा मात्र राजकीय वर्तुळात सध्या जोरात रंगली आहे.

Shiv Sena’s “New Sanjay Raut”??; Sushma Andhare or anyone else??; But will they get Rauta’s “glamour”

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात