sanjay pande : ईडी पाठोपाठ सीबीआयच्या जाळ्यात; गुन्हा दाखल; मुंबई, पुण्यासह १९ ठिकाणी छापे


वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे निवृत्ती नंतर दुसऱ्या दिवशी सक्तवसुली अर्थात ईडी संचलनालयाच्या जाळ्यात अडकले. त्या पाठोपाठ आता सीबीआयच्या जाळ्यातही अडकले आहेत. ईडीने त्यांना 5 जुलै रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत समन्स बजावले होते. नॅशनल स्टाॅक एक्स्चेंजमधील सर्व्हर ( राष्ट्रीय शेअर बाजार) घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी केली गेली. Sanjay Pandey ED followed by CBI Filing a crime

यानंतर आता 2009 ते 2017 या काळात NSE कर्मचा-यांचे फोन बेकायदेशीर टॅप केल्याप्रकरणी सीबीआयने संजय पांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात पुणे मुंबई सह देशभरात 19 ठिकाणी छापेमारी सुरू आहे.

एमएचएच्या आदेशानंतर सीबीआयने एनएसई घोटाळ्यात बेकायदेशीर फोन टॅपिंगचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त पांडे आरोपी ठरवण्यात आले आहेत. याप्रकरणी देशभरात सीबीआयने छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. NSE घोटाळ्यातील आरोपी चित्रा सुब्रमण्यम हिने संजय पांडे यांना NSE मधील लोकांचे फोन टॅप करण्यास सांगितले होते.

Sanjay Pandey ED followed by CBI Filing a crime

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात