SAMEER WANKHEDE: ‘ती’ बातमी खोटी ! माझ्या बदलीच्या फक्त अफवा ; मी अजूनही झोनल डायरेक्टरच : समीर वानखेडे


एनसीबीने आर्यन खान प्रकरणासह 6 प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्या हातातून काढून घेतला असल्याचे वृत्त केवळ अफवा असल्याचे समीर वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे. SAMEER WANKHEDE: ‘That’ news is false! Just rumors of my replacement; I am still the Zonal Director: Sameer Wankhede


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास एनसीबीचे झोनल डायेक्टर समीर वानखेडे यांच्या हातातून काढून घेण्यात आल्याचे वृत्त सध्या चर्चेत आहे.मात्र हे वृत्त खोटे असून समीर वानखेडे अद्यापही झोनल डायरेक्टर पदावर कायम आहेत. फक्त यापुढील तपासात त्यांच्यासह दिल्लीतील टीम देखील असणार आहे .

समीर वानखेडेंसह एनसीबीची नवीन टीम याप्रकरणाचा तपास करणार आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडे याप्रकरणाचा तपास सोपवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

फक्त आर्यन खानचे ड्रग्ज प्रकरण नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा जावई समीर खानसह 6 प्रकरणांचा तपास त्यांच्या हातातून काढून घेण्यात आले आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू असताना आता समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत आहे. या आरोपानंतर एनसीबीने मोठा निर्णय घेत आर्यन खान प्रकरणासह 6 प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्या हातातून काढून घेतला. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून समीर वानखेडेची हकालपट्टी केल्यानंतर दिल्ली एनसीबीचे एक पथक शनिवारी मुंबईत येणार आहे. हे पथक मुंबई झोनमधील आर्यन खान प्रकरणासह इतर 5 म्हणजे एकूण 6 प्रकरणांची चौकशी करेल. एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी ही माहिती दिली.

यासर्व घडामोडींवर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे सांगितले की, ‘माझी बदली झाली नाही. बदलीच्या फक्त अफवा आहेत. मी अद्याप झोनल डायरेक्टर पदावर कायम आहे. फक्त माझ्याकडील सहा केसेस दिल्लीतील टीमकडे देण्यात आल्या आहेत. मला तपासातून वगळण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा तपास कोणत्या तरी केंद्रीय तपास एजन्सीमार्फत व्हावी यासाठी मी न्यायालयात याचिका दाखल केली होती. आर्यन खान आणि समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी टीम करत आहे. दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी टीममध्ये हा एक समन्वय आहे.’

SAMEER WANKHEDE : ‘That’ news is false! Just rumors of my replacement; I am still the Zonal Director: Sameer Wankhede

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात